Thursday, April 18, 2024

‘तुम्ही तुमचे काम करा’, फिरोज खान यांचे शब्द ऐकताच अभिनेते राजकुमार झाले होते रागाने लालेलाल, दिली होती ‘ही’ धमकी

दिग्गज अभिनेते फिरोज खान यांना चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावण्यासाठी जोरदार संघर्ष करावा लागला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात फिरोज यांना अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम करावे लागले, पण १९६५ साली त्यांना एक मोठा चित्रपट मिळाला. ‘ऊंचे लोग’ या चित्रपटात त्यांना, तत्कालीन ज्येष्ठ अभिनेते राजकुमार आणि अशोक कुमार यांच्यासारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाविषयी फिरोज यांची उत्सुकता सहज लक्षात येऊ शकते. दुसरीकडे, राजकुमार एक असे अभिनेते होते, जे मोठमोठ्या कलाकारांना देखील क्षुल्लक समजत असे, तर नवीन कलाकारांची स्थिती काय असेल?

दिग्गज कलाकार राजकुमार यांचा एक रुबाब होता. फिरोज खान हे राजकुमार यांच्या स्वभावाशी परिचित नव्हते. चित्रपटाच्या एका सीनमध्ये राजकुमार यांना फिरोज खानच्या डोळ्यात डोळे घालून डायलॉग बोलायचा होता. यानंतर फिरोजला एक संकेत द्यायचा होता. पण सवयीला भाग पडून, राजकुमार डायलॉग बोलल्यानंतर फिरोज यांना काहीच संकेत देत नव्हते. यामुळे, शॉट पूर्ण होऊ शकला नाही. टेक होत होते, पण राजकुमार त्यांच्या सवयीमुळे कोणतीही मदत करत नव्हते.

आता राजकुमार तर राजकुमारच होते. त्यांची वर्तणूक पाहून, दिग्दर्शक फनी मजुमदार यांचीही अभिनेत्याला काही बोलण्याची हिम्मत झाली नाही. अशा परिस्थितीत, नव्यानेच आलेल्या फिरोज खान यांना ओरडा बसला. आपली चूक लपवण्यासाठी, राजकुमार फिरोजला अभिनयाचे धडे देऊ लागले.

फिरोज खान भलेही पहिल्यांदाच ए ग्रेड चित्रपटात काम करत होते, पण या परिस्थितीत त्यांनाही राग आला. फिरोज राजकुमारला म्हणाले की, “तुम्ही तुमचे काम करा आणि मला माझे काम करू द्या.” हे ऐकून राजकुमार यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते इतके संतापले की, फिरोज खानला सेटवरून बाहेर काढण्याची धमकी देऊ लागले. चित्रपट दिग्दर्शक आणि तिथे उपस्थित लोकांनी कसाबसा राजकुमार यांचा राग शांत केला आणि सीनचे शूट पूर्ण केले.

तसेच, १९६५ मध्ये रिलीझ झालेल्या या चित्रपटात राज कुमार, अशोक कुमार आणि फिरोज खान यांच्याव्यतिरिक्त कन्हैया लाल, देवेन वर्मा आणि तरुण बोस हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखे दिसण्याच्या नादान गमावला जीव, कॉस्मेटिक सर्जरीमुळे ‘या’ अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

हे देखील वाचा