Thursday, April 18, 2024

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

सोशल मीडिया सेन्सेशन असणारी उर्फी जावेद ही सतत तिच्या अतरंगी कपड्यांमुळे आणि फॅशनमुळे लाइमलाइट मिळवत असतात. अगदी दररोजच तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. तिला तिच्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मात्र ती त्याकडे दुर्लक्ष करते. मात्र आता उर्फी पुन्हा चर्चेत आलीच आहे, पण कारण जरा वेगळे आहे. उर्फीला एका रेस्टोरंटमध्ये एन्ट्री दिली नाही आणि म्हणून तिने सोशल मीडियावर तिचा राग व्यक्त केला आहे.

उर्फी जावेदला मुंबईच्या एका रेस्टोरंटमध्ये घुसू दिले नाही. तिला तिथे प्रवेश देण्यास नकार मिळाला. यांनतर तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या कमालीची व्हायरल होते. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “मुंबई खरंच हे २१ वे दशक आहे? आज मला एका रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला. जर तुम्ही माझ्या कपड्यांना, फॅशनला पसंत करत नसाल तर ठीक आहे. मात्र यासाठी माझ्यासोबत असा व्यवहार करणे योग्य नाही. आणि जर तुम्ही तसे करत असाल तर ते स्विकारा खोटी कारणं नका देऊ.” ही पोस्ट शेअर करताना तिने झोमॅटोला टॅग केले आहे. यावरून लक्षात येते की, तिला झोमॅटो रेस्टोरंटमध्ये प्रवेश दिला गेला नाही.

उर्फी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या अवतारातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती अगदी बिनधास्तपणे तिचे बोल्ड कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी फिरताना पापराजींच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होते. करीना कपूरने देखील उर्फीच्या फॅशनचे कौतुक केले आहे.

उर्फीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे, मात्र तिला बिग बॉस ओटीटीमुळे खरी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तर उर्फीने तिच्यातली फॅशन डिझायनर बाहेर काढली आता तर उर्फी हे नाव सर्वांच्या परिचयाचे झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दगडाची किंमत वाढवत आहे” घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्री पोस्ट झाली व्हायरल

दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…

हे देखील वाचा