Monday, July 1, 2024

‘बॉर्डर’ चित्रपटानंतर २४ तास जे. पी. दत्तांसोबत असायचे बॉडीगार्ड; येत होत्या जीवे मारण्याच्या धमक्या

चित्रपटसृष्टीत असे अनेक दिग्दर्शक आहेत, जे विविध प्रकारचे चित्रपटांची निर्मिती करुन चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहेत. मात्र, याच दिग्दर्शकांना कधीकाळी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकदा वाईट प्रसंगाला समोर जावे लागते. असेच प्रसिद्ध दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांना बाॅलिवूडमधील ‘बाॅर्डर’, ‘रिफ्यूजी’, ‘एलओसी कारगिल’ सारख्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत आजही चाहत्यांच्या मनावर खुल्या भावना कोरणारा चित्रपट ‘बाॅर्डर’ हा हिंदी चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ओळखला जातो. भारत १५ ऑगस्ट रोजी ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने आपण ‘बॉर्डर’ या सिनेमांच्या दिग्दर्शकांना मिळालेल्या धमकीबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

तम्हाला माहीत आहे का? ‘बाॅर्डर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे.पी. दत्ता यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. यादरम्यान जे. पी. दत्तांचे संरक्षण वाढवण्यात आले होते. ‘बाॅर्डर’ चित्रपटानंतर जे.पी. दत्तांना ‘एलओसी कारगिल’वर चित्रपट बनवायचा होता. मात्र, त्यावेळी त्यांना अनेक प्रसंगाना समोरे जावे लागले होते.

जे. पी. दत्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘बॉर्डर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन अंगरक्षक त्याच्यासोबत सावलीसारखे २४ तास राहू लागले. चार महिन्यांपासून त्यांला एकटे कुठेही जाण्यास परवानगी नव्हती. दत्ता यांना कथितरीत्या युद्धावर चित्रपट बनवण्यासाठी पाकिस्तानकडून धमक्या येत होत्या. असे असूनही जेपी दत्ता यांनी हा चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले होते.

जे. पी. दत्तांचे कुटुंब त्यांना दुसरा चित्रपट बनवण्यासाठी विरोध करत होते. त्यावेळी दत्ता म्हणाले, “आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने मरावे लागणार आहे. जर एखादा सैनिक तिथे उभा राहून माझ्यासाठी मरू शकतो, तर मी त्याच्यासाठी का मरू शकत नाही? या धमक्यांमुळे मी घाबरणार नाही.”

दत्ता पुढे म्हणाले की, “एलओसी कारगिलनंतर धमक्या थांबल्या.”

सन १९९९च्या कारगिल युद्धाच्या घटना दाखवणाऱ्या या चित्रपटात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, सैफ अली खान, मनोज बाजपेयी, अक्षय खन्ना, करीना कपूर, राणी मुखर्जी, रवीना टंडन आणि ईशा देओल यांच्या मुख्य भूमिका होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
हे माहितीये का? इतिहास रचणाऱ्या ‘या’ १७ व्यक्तींचा जन्म पाकिस्तानचा, पण त्यांनी भारतालाच मानले आपले घर
खान कुटुंबाचा ‘हा’ फोटो पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुगेल, तिरंग्याला सलाम करताना दिसला ‘पठाण’
आख्खा देश पाहतोय ‘पुष्पा २’ची वाट, पण ‘या’ बातमीने केला चाहत्यांचा मूड ऑफ; सुपरस्टार अभिनेता बाहेर

हे देखील वाचा