Saturday, July 27, 2024

भारतातील सर्वात मोठा आतंकी हमला असलेल्या २६/११ वर आधारित ‘हे’ सिनेमे अंगांवर आणतील शहारे

वेगवेगळ्या विषयांवर आपल्याकडे सतत सिनेमे बनत असतात. मागील काही वर्षांपासून चित्रपटांच्या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्वी चित्रपट हे काल्पनिक कथांवर तयार व्हायचे. मात्र आता ही व्याख्या बदलली असून, सत्य घटनांवर आधारित सिनेमे देखील आता आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. चित्रपट हे समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचतात. त्यामुळे समजत घडणाऱ्या मोठ्या आणि महत्वाच्या घटनांना चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवल्या जातात. चित्रपटाच्या माध्यमातून लोकनंही त्या घटनांच्या मागची बारीक सारीक माहिती मिळते. आपल्या देशातील सर्वात मोठा आतंकवादी हल्ला ठरलेल्या २६/११ वर देखील अनेक सिनेमे आणि वेबसिरीज तयार झाल्या आहेत. यांच्या माध्यमातून त्या संपूर्ण घटनेमागील इत्यंभूत माहिती जगासमोर आली. २६/११ हा दिवस संपूर्ण भारतासाठी आणि भारतीयांसाठी कला दिवस समजला जातो. आजवरच्या इतिहासात भारतावर एवढ्या मोठ्या स्वरूपाचा हल्ला पहिल्यांदाच झाला. या हल्ल्यात अनेक लोकांनी त्यांचे जीव गमावले, तर काही गंभीर जखमी झाले. अनेक पोलीस शहीद झाले. आज या हल्ल्याला होऊन १२ वर्ष पूर्ण झाली, मात्र तरीही या हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. या दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया मनोरंजनविश्वात या घटनेवर कोणकोणते सिनेमे तयार झाले आहेत.

द अटॅक ऑफ २६/११ :
राम गोपाळ वर्मा यांच्या या सिनेमात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी पोलीस जॉईंट कमिशनर ही भूमिका साकारली होती. या सिनेमात १० आतंकवादी आणि अजमल कसाब यांची कहाणी अतिशय प्रभावी पद्धतीने मांडण्यात आली आहे.

हॉटेल ताज :
२६/११ या हल्ल्यात सर्वात जास्त लक्ष केलेली जागा म्हणजे ताज हॉटेल. या हॉटेलमध्ये अनेक विदेशी नागरिक थांबले होते. याच विदेशी किंबहुना सर्वच हॉटेलमधील पाहुण्यांना हॉटेलचा स्टाफ कसा सुखरूप बाहेर काढतो आणि त्यांचा जीव वाचवतो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा बहुतकरून ताज हॉटेलवरच केंद्रित आहे.

ताज महाल :
मुंबईवर झालेल्या २६/११ या हल्ल्यावर जेवढे सिनेमे बनले तेवढे सर्वच पोलिसांच्या आणि सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून दाखवले गेले. मात्र या सिनेमात ताज हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान एक १८ वर्षाची फ्रांसिसी मुलगी हॉटेलच्या रूममध्ये एकटी असते, आणि या हल्ल्याला धीराने तोंड देते.

फँटम :
सैफ अली खान आणि कॅटरिना यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात २६/११ चा मुंबई हल्ला झाल्यानंतर भारताने केलेली कारवाई आणि या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची गोष्ट दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा या हल्ल्यावर आधारित असलेल्या ‘मुंबई एवेन्जर्स’ या पुस्तकावर आधारित आहे.

वन लेस गॉड :
२६/११ हल्ल्यावर तयार झालेला हा सिनेमा जरा वेगळा आहे. या हल्ल्यात अनेक विदेशी पर्यटक देखील मारले गेले. या विदेशी पर्यटकांना वाचवण्यासाठी झालेले प्रयत्न या सान्म्त दाखवण्यात आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा