Saturday, June 29, 2024

एकेकाळी ‘आशिकी’च्या कलाकारांनी केली होती सर्वांवर जादू; आता काय करतायेत ‘हे’ कलाकार?

बॉलिवूडचा 20 व्या शतकातील सुपरहिट चित्रपटांपैकीच ‘आशिकी’ हा एक आहे. ‘आशिकी’ हा आजच्या दिवशी म्हणजेच 17 ऑगस्ट 1990 रोजी रिलीझ झाला होता. या चित्रपटाने सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले होते. यात आपल्या सर्वांना नवीन चेहरे पाहायला मिळाले, ते म्हणजे राहुल रॉय आणि अनु अग्रवाल. या चित्रपटातील गाणे देखील खूप गाजले होते. या चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये देखील या धुमाकूळ घातला होता. सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- पुरुष, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- स्त्री, म्हणजे चित्रपट ‘आशिकी’ ने चित्रपट संगीताशी संबंधित सर्व चार श्रेणी जिंकल्या होत्या.

‘आशिकी’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर राहुल यांना जवळजवळ 50 चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. ते तीनही शिफ्टमध्ये काम करायचे. पण त्यानंतर ते कुठे गेले कोणालाही माहीत नव्हते. त्याचबरोबर या चित्रपटाची अभिनेत्री अनु अग्रवालच्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. आज ‘आशिकी’ या चित्रपटाला 31 वर्षे पूर्ण झाले आहेत. या खास प्रसंगी, या चित्रपटाची स्टारकास्ट आता कुठे आहे आणि काय करते, हे सर्व या लेखातून जाणून घेऊया.

राहुल रॉय – राहुल
अभिनेता राहुल रॉय यांना ‘आशिकी’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली होती. त्याचबरोबर त्यांना ‘रोमँटिक हिरो’, ‘लव्हर बॉय’ अशी अनेक नावे मिळाली. राहुल रॉय यांचा पहिला चित्रपट ‘आशिकी’ हिट ठरला. पण नंतर ते सिनेमामधून गायब झाले. राहुल यांचा पहिला चित्रपट ‘आशिकी’ खूप गाजला. पण त्यानंतरचे त्यांचे 25 चित्रपट पडद्यावर फ्लॉप ठरले. गेल्या काही महिन्यापूर्वी राहुल यांना कारगिलमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ब्रेन स्ट्रोकची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना बराच काळ मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या राहुल बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे आणि आता ते घरी परतले आहेत.

 

अनु अग्रवाल – अनु
अभिनेत्री अनु यांनी पहिल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये यशाची नवी वाट निर्माण केली होती. पण अनु यांना या यशाचा आनंद फार काळ घेता आला नाही. ‘आशिकी’नंतर अनु ‘किंग अंकल’ आणि ‘खलनायिका’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. पण या दोन्ही चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. 1999 मध्ये असे काहीतरी घडले, ज्याने अनु अग्रवाल यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले होते. घडले असे की, एका भयानक अपघातामुळे अनु कोमात गेल्या होत्या. तेव्हा अनु सुमारे एक महिन्यानंतर कोमातून बाहेर आल्या नव्हते. त्यानंतर त्या स्वतःला पूर्णपणे विसरून गेल्या होत्या. अनु यांना या अपघातातून सावरायला बरीच वर्षे लागली, ज्यामुळे त्यांची चित्रपट कारकीर्द संपुष्टात आली. आता अनु सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

दीपक तिजोरी- बालू
दीपक तिजोरी हे 90च्या दशकातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी नायकाच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ‘आशिकी’मध्ये त्यांनी सकारात्मक पात्र साकारले होते. आशिकी व्यतिरिक्त दीपक तिजोरी यांनी ‘कभी या कभी ना’ आणि ‘जो जीता वही सिकंदर’ यासह अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय पात्रे साकारली आहेत. त्यानंतर दीपक हे अद्याप रुपेरी पडद्यावर दिसले नाही.

टॉम अल्टर – वसतिगृह मालक
टॉम अल्टर यांनी 300हून अधिक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ‘आशिकी’मध्ये त्यांनी मुलींच्या वसतिगृहाच्या मालकाची भूमिका साकारली होती. अभिनेता, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते टॉम अल्टर यांचे 29 सप्टेंबर 2017 रोजी निधन झाले.

अवतार गिल – पोलीस निरीक्षक देशपांडे
अभिनेता अवतार गिलने या चित्रपटात पोलीस निरीक्षक देशपांडे यांची भूमिका साकारली होती. चित्रपटांशिवाय अवतार गिल अनेक मालिकांमध्ये दिसले होते. इतकेच नव्हे, तर ते उद्योगात सतत सक्रिय आहे. ‘अग्निपथ’, ‘बादशाह’, ‘बडे मियां छोटे मियां’, ‘एअरलिफ्ट’ आणि ‘वजीर’ हे त्यांचे मुख्य चित्रपट आहेत.

रीमा लागू – राहुलची आई

अभिनेत्री रीमा लागू यांनी चित्रपटात राहुलच्या आईची भूमिका साकारली होती. रीमा लागू यांचे 2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अनेक टीव्ही कार्यक्रमांव्यतिरिक्त रीमा यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. रीमा लागूंना चित्रपटांमध्ये आईच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते.

अधिक वाचा- 
श्रद्धाने केवळ टीव्हीच नव्हे, तर साऊथमध्येही वाजवलाय अभिनयाचा डंका; दोनदा साखरपुडा तोडून केलं होतं सर्वांना चकित
‘बापल्योक’ चित्रपटाच्या यशासाठी टीमचे माता तुळजाभवानीला साकडे; पाहा फोटो

हे देखील वाचा