आख्ख्या भारतात अनेकांना मदत करणाऱ्या सोन सुदला आहे ‘या’ गोष्टीची खंत, म्हणाला…


कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र कहर केला आहे. संपूर्ण देशात वैद्यकीय सुविधांचा तुटवडा निर्माण होत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमेडेसिवीर इंजेक्शनचा देखील अभाव निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनासोबत अनेकजन गरजूंना मदत करत आहेत. अनेक कलाकार , खेळाडू आता या संकटाचा सामना करण्यासाठी रुग्णांना मदत करत आहेत.

अशा रुग्णांना मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सूदचे नाव टॉपला आहे. त्याने मागच्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊन दरम्यान देखील अनेक मजूर कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मदत केली आहे. तसेच तिथे जाऊन त्यांच्या रोजगाराची देखील त्याने सोय लावून दिली होती. मागच्या वर्षी पासून तो अनेक गरजूंना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला स्वतःला देखील कोरोनाची लागण झाली होती तरी देखील त्याने अनेकांना मदत केली आहे.

सोनू सूदने रविवारी एक ट्विट केले आहे. त्यात त्याने गरजू व्यक्तीपर्यंत लवकर पोहचू न शकल्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की,” काल मला 41, 660 लोकांची मदतीसाठी रिक्वेस्ट आली आहे. आम्ही प्रत्येकापर्यंत पोहचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण हे आमच्याकडून शक्य होणार नाही. जर मी प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहण्याच्या प्रयत्न केला तर मला ते करायला जवळपास 14 वर्ष लागतील. म्हणजेच 2035 पर्यंत मी सगळ्या‌ लोकांपर्यंत पोहचू शकतो.”

काही दिवसांपूर्वी सोनू सूदने भारत सरकारला विनंती केली होती की, कोरोनामुळे ज्यांच्या आई वडिलांचे निधन झाले आहे त्यांना मोफत शिक्षण द्या. समाजात जागरूकता पसरवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला आहे. सोनू सूदने 25 एप्रिलला एक टेलीग्राम चॅनेल लॉन्च केला आहे. ज्याच्या माध्यमातून तो देशभरातातील गरजू लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे. शनिवारी त्याने ट्विट करून संपूर्ण देशातील नागरिकांना सोनू सूद कोव्हिड फोर्स जॉइंड करण्याची विनंती केली आहे. सोबतच त्याने लिहिले आहे की,”आता संपूर्ण देश सोबत येणार आहे. माझ्या सोबत टेलिग्राम चॅनलवर जॉईंड होऊन सगळ्यांना मदत करूयात, देशाला वाचवूयात.”


Leave A Reply

Your email address will not be published.