Tuesday, April 21, 2026
Home बॉलीवूड OTT वर अ‍ॅक्शन-थ्रिलरचा महासंगम, ‘प्रतिछाया’पासून 24 पर्यंत या आठवड्यात होतील रीलीज

OTT वर अ‍ॅक्शन-थ्रिलरचा महासंगम, ‘प्रतिछाया’पासून 24 पर्यंत या आठवड्यात होतील रीलीज

आज-काल ओटीटी वर मालिका, चित्रपट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यामध्ये ही आणि कॅटेगरी आता उपलब्ध आहे जसे की हॉरर, फॅमिली टाईप, मनोरंजक, सस्पेन्स थ्रिलर असे प्रकार आता उपलब्ध आहेत. त्यातला त्यात हॉरर चित्रपटांचा क्रेझ आजकाल जास्त दिसून येतो. प्रेक्षक घर बसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून नवनवीन चित्रपट मालिका पाहू शकतात. तर आता अनेक नवनवीन कन्टेट प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत. नेटफ्लिक्सपासून ते जिओ हॉटस्टारपर्यंत, यावेळी प्रत्येक प्लॅटफॉर्म मनोरंजनाचा मोठा डोस मिळणार आहे.

प्रतिछाया –  जर तुम्हाला सत्तेची वर्तुळे आणि राजकारणातील खोलवरचे डावपेच पडद्यावर उलगडताना पाहायला आवडत असतील, तर प्रतिछाया तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.  हा चित्रपट 24 एप्रिल रोजी जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम केला जाऊ शकतो.

‘हॅपी राज’- हा चित्रपट रोमान्स आणि हलक्याफुलक्या विनोदाचा मिलाफ आहे, तुम्हाला जर काॅमेडी चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. कौटुंबिक नाट्याने परिपूर्ण असलेला हा चित्रपट 24 एप्रिल रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

24 – हा चित्रपट अनिल (anil)कपूर अभिनीत आहे. तर या चित्रपटात अनिल कपूर पुन्हा एकदा एटीएस प्रमुख जय सिंग राठोड यांच्या भूमिकेत आपली जादूई झलक दाखवणार आहेत. ’24’ ही एक बहुप्रतिक्षित, उत्कंठावर्धक ॲक्शन थ्रिलर मालिका आहे.

‘बँड मेला’ – हा चित्रपट प्रेम आणि विरहाची एक भावनिक कथा सादर करते. काळ आणि परिस्थिती बालपणीच्या प्रियकरांना कसे वेगळे करतात आणि अनेक वर्षांनंतर आयुष्य त्यांना कसे एकत्र आणते, हे यात दाखवले आहे. हा रोमँटिक ड्रामा 24 एप्रिल रोजी ZEE5 वर प्रदर्शित होईल. तर या व्यतिरीक्त अपैक्स,स्ट्रेंजर थिंग्स: टेल्स फ्रॉम ’85, ब्रुकलिन नाइन-नाइन या सारखे अनेक मालिका आणि चित्रपट या वीक मध्ये रीलीज होतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रणवीर-दिपिका दुसऱ्यांदा होणार आई बाबा, दिपिकाने शेअर केली गुडन्यूज

हे देखील वाचा