Wednesday, July 3, 2024

अभिनेत्याच्या निधनानंतर पत्नीवर मोठं संकट, ‘एवढ्या’ लाखांच्या कर्जाखाली दबलंय दीपेश भानचं कुटुंब

मागील महिन्यात म्हणजेच २३ जुलै रोजी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता हे जग सोडून देवाघरी गेला. तो अभिनेता म्हणजेच, दीपेश भान होय. ‘भाबी जी घर पर है‘ फेम दीपेश याच्या निधनाने अवघ्या कलाविश्वाच्या पायाखालची जमीन सरकली होती. दीपेशचे निधन झाले असले, तरी त्याचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. अशात त्याची सहअभिनेत्री असलेली सौम्या टंडन हिने पुढे येत त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी इंस्टाग्रामवरून विनंती केली.

अभिनेत्री सौम्या टंडन (Saumya Tandon) हिने व्हिडिओ शेअर करत रुपये दान करण्यास सांगितले. यामुळे दिवंगत अभिनेता दीपेश भान (Deepesh Bhan) याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांचे गृहकर्ज फेडण्यात मदत मिळू शकेल. यासोबतच तिने दीपेशसोबतच्या काही आठवणीही ताज्या केल्या.

सौम्याने व्हिडिओ शेअर करत मागितली मदत
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत सौम्या म्हणत आहे की, “दीपेश भान आता आपल्यात राहिला नाहीये, पण त्याच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. तो खूपच बोलका व्यक्ती होता आणि नेहमीच त्याच्या घराबाबत बोलायचा. त्याने हे घर त्याच्या कुटुंबासाठी कर्जावर खरेदी केले होते. त्याने लग्न केले आणि त्याला एक मुलगाही आहे. मात्र, तो त्यानंतर खूप लवकर आपल्याला सोडून गेला. आता आपण त्याच्या मुलाला त्याचे घर परत देऊन, त्याचे कर्ज फेडू शकतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_)

दीपेशच्या कुटुंबावर ५० लाख रुपयांचे गृहकर्ज
“मी एक अकाऊंट तयार केले आहे, आणि त्यात जो पैसा जमा होईल, तो दीपेशच्या पत्नीला दिला जाईल. ज्यामुळे ते त्यांचे गृहकर्ज फेडू शकतील. दीपेशचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान द्या,” असेही सौम्या पुढे बोलताना म्हणाली. सौम्याने व्हिडिओसोबत अकाऊंटची लिंकही शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_)

ब्रेन हॅमरेजमुळे झाले होते दीपेशचे निधन
दीपेश भान याचे निधन २३ जुलै, २०२२ रोजी क्रिकेट खेळताना झाले होते. खरं तर, दीपेश सकाळी ७ वाजता जिममध्ये जात होता आणि मध्येच क्रिकेट खेळण्यासाठी थांबला. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्याचा सहकलाकार आसिफ शेख याच्यानुसार, त्याचे निधन ब्रेन हॅमरेजमुळे झाले होते. दीपेश याला ‘भाबी जी घर पर है’ मालिकेतून ओळख मिळाली होती. तो या मालिकेत ‘मलखान’ या भूमिकेत झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
भगत सिंगवर बॉलीवूडमध्ये बनले आहे सर्वाधिक चित्रपट, पाहा यादी……
सिद्धू मूसेवालाचे गाणे गाताना मंचावरच कपिल शर्माला कोसळले रडू, ह्रदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
करण जोहरवर लागला सारा आणि कार्तिकचे नाते सर्वांसमोर आणल्याचा आरोप, शोच्या दिग्दर्शकाने दिले स्पष्टीकरण

हे देखील वाचा