Tuesday, April 16, 2024

करण जोहरवर लागला सारा आणि कार्तिकचे नाते सर्वांसमोर आणल्याचा आरोप, शोच्या दिग्दर्शकाने दिले स्पष्टीकरण

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा (Karan johar) शो ‘कॉफी विथ करण सीझन ७’ सतत चर्चेत असतो. शोमध्ये नेहमीच नवीन स्टार्स पाहुणे म्हणून येत असतात. दरम्यान, शोदरम्यान सारा अली खान (sara ali khan) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aryan)रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांमुळे करण जोहर चर्चेत आहे. कार्तिक आर्यन आणि सारा रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा करणने केला होता. याशिवाय करणने शोदरम्यान अनन्या पांडेच्या डेटींगबद्दलही प्रश्न विचारले.

करण जोहरवर कॉफी विथ करणमध्ये असे प्रश्न विचारल्याचा आरोप केला जात आहे की, तो नेहमी सर्वांसमोर इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करतो. त्याचवेळी, टीव्ही रेडिओ होस्ट सिद्धार्थ काननने एका मुलाखतीदरम्यान करण जोहरला याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्याने उत्तर दिले की, या नात्यांबद्दल सर्वांना माहिती आहे. मी स्वतः काहीही बनवलेले नाही. सर्वांनी त्यांना एकत्र पाहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

करण जोहर पुढे म्हणाला की, “जे सत्य आहे ते सत्य आहे आणि मला वाटते की प्रत्येकाला यात काही अडचण नाही.” करण पुढे म्हणाला की, “प्रत्येकाला प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती आहे आणि आपण त्याबद्दल बोललो तर त्यांची हरकत नाही.” करण जोहरच्या शोच्या एका एपिसोडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर पोहोचल्या होत्या. येथे करणने सारा आणि कार्तिकच्या नात्याबद्दल सांगितले.

याशिवाय करणने शोदरम्यान सारा अली खानच्या क्रशवरही प्रश्न विचारला होता, ज्याच्या उत्तरात साराने साऊथ अभिनेता विजय देवराकोंडाचे नाव घेतले. त्याच वेळी, शोच्या एका एपिसोडमध्ये करण जोहरने अनन्या पांडेच्या (Anannya pandey) वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील सांगितले आणि सांगितले की अनन्या लवकरच कोणालातरी डेट करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेते मनोज तिवारी यांच्या ‘हर घर तिरंगा’ गाण्याची धूम, व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
‘लोक कमी समजतात’, दृष्टी धामीने टीव्ही स्टार्सबद्दल सांगितले ‘ही’ मोठी गोष्ट
आपल्या विनोदाने खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांची ह्रदयस्पर्शी लवस्टोरी, तब्बल १२ वर्ष पाहिली होती वाट

हे देखील वाचा