अभिनेत्री जुही चावलाचे 5 जी प्रकरण सर्वांना आठवतच असेल. या प्रकरणातून जुही पूर्णपणे बाहेर पडलेली दिसत नाही, सध्या या प्रकरणात जुहीचे टेन्शन अधिकच वाढले आहे. दिल्ली राज्य विधिक सेवा प्राधिकरणने जुही चावल्याच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. डीएसएलएसएच्या या याचिकेवर येत्या ३ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी जुहीने 5 जी आल्यामुळे माणसापासून ते पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार असल्याचे सांगत कोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणात कोर्टाने तिची याचिका फेटाळत तिच्यावर २० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. डीएसएलएसए या २० लाखांच्या दंडाची वसुली करण्याबद्दल कोर्टात आता याचिका दाखल केली आहे.
जुहीने देखील तिची याचिका फेटाळल्यानंतर या निर्णयाला आव्हान देताना हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जुही चावल्याच्या वकिलांनी न्यायमूर्ती अमित बंसल यांना सांगितले की, एकल न्यायाधीश यांच्या आदेशाच्या विरोधात त्यांची अपील प्रलंबित असून, ज्यावर २५ जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याने सध्या ही सुनावणी टाळण्याची विनंती केली आहे.
डीएसएलएसए यांचे वकील असलेल्या सौरभ कंसल यांनी सांगितले की, जुही चावलाकडून दंड घेण्याचा आदेश जूनमध्ये दिला गेला होता, मात्र त्याचे पालन करण्याचे अजून बाकी आहे. त्यांनी दावा करत सांगितले की, नोटीस पाठवल्यानंतरच या विरोधात याचिका दाखल केली गेली. यावर जुही चावलाचे वकील असलेल्या दिपक खोसला यांनी सांगितले की, सिंगल बेंचला दंड लावण्याचा अधिकार नाही.
विधिक सेवा प्राधिकरणच्या वकिलांनी सांगितले की, जुही चावलावर लावण्यात आलेल्या दंडाला सात महिन्यांपेक्षा अधिकच काळ झाला असल्याने आता पुढील सात दिवसाच्या आत तिने या दंडाची रक्कम डीएसएलएसएकडे जमा केली पाहिजे. विधिक सेवा प्राधिकरणचे वकील सौरभ कंसल आणि पल्लवी एस कंसल यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेमध्ये डीएसएलएसएने दंड वसूल करण्यासाठी जुहीची चल आणि अचल संपत्तीची कुर्की आणि विक्रीचे वॉरंट काढण्याची विनंती करत कोर्टाकडे मदत मागितली आहे.
हेही वाचा :