Friday, July 12, 2024

‘सलमानच्या फार्महाऊसवर कलाकारांना मारून गाडून टाकलंय’ | Salman Khan

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. अशातच त्याचे आणि त्याच्या शेजाऱ्याचे भांडण चांगलेच चर्चेत आहे. सलमान खान त्याच्या शेजाऱ्यावर मानहानीचा आरोप करत आहे. नुकतेच झालेल्या सुनावणीमध्ये सलमान खानच्या वकिलाने सांगितले की, ‘त्यांच्या भांडणात तो शेजारी विनाकारण त्याचा धर्म आणत आहे.’ हा वाद तेव्हापासून सुरू झाला आहे. जेव्हा सलमान खानच्या फार्म हाऊसच्या शेजारी प्लॉट घेणाऱ्या केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर अनेक आरोप केले होते. यानंतर सलमानने त्याच्या विरोधात केस दाखल केली.

सलमान खान आणि त्याचा शेजारी केतन कक्करमधील वाद मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. माध्यमांतील माहितीनुसार, सलमानचे वकील प्रदीप गांधीने केतनची पोस्ट आणि इंटरव्ह्यू समोर वाचून दाखवले . त्याने सलमानवर असा आरोप केला की, ‘सलमान डी गँगचा मेंबर बनला आहे.’ त्याने सलमान खानच्या धर्मावर देखील कमेंट केली. तसेच त्याने सांगितले की, तो सेंट्रल पार्टी आणि स्टेट लेव्हल राजनेत्याच्या संपर्कात आहे. तसेच त्याने सांगितले की, ‘सलमान खानच्या फार्महाऊसवर अनेक कलाकारांचे मृतदेह गाडले आहेत.’ (Salman Khan replies to his farmhouse neighbour ketan kakkad allegations in defamation case hearing)

यावर सलमानने उत्तर दिले की, “हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. या सगळ्याला काहीही पुरावा नाहीये. प्रॉपर्टीच्या वादात तुम्ही माझी इमेज खराब करत आहात. तुम्ही माझ्या धर्माला मधे का आणत आहात. माझी आई हिंदू आहे आणि माझे वडील मुस्लिम आहे. माझ्या भावांनी देखील हिंदू धर्मात लग्न केले आहे. आम्ही सगळे सण साजरे करतो.”

सलमानने पुढे आंगितेल की, “तुम्ही एक शिकलेली व्यक्ती आहात, कोणी गुंड नाही जे माझ्यावर असे आरोप करत आहात. आजकाल सगळ्यात सोप्पे काम म्हणजे काही लोकांना एकत्र करा, सोशल मीडियावर जा आणि तिकडे सगळा राग बाहेर काढा.” तसेच त्याने हे देखील सांगितले की, त्याला राजकारणात जाण्याची अजिबात इच्छा नाहीये. तसेच केतनने जे काही आरोप केले आहेत. त्यामुळे त्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा