Wednesday, March 29, 2023

तब्बल 60 वर्ष ‘या’ एक्सप्रेशन क्वीनने चित्रपटसृष्टीवर गाजवले राज्य

हिंदी चित्रपटसृष्टीत एक अशी अभिनेत्री होती जिच्या एक्सप्रेशनने तीने चाहत्यांना वेड लावले. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सर्वांची आवडती मनोरमा म्हणजेच एरिन आयझॅक डॅनियल. तीने बऱ्याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भुमिका साकारल्या. तिचा अभिनय असा असायचा की मोठ्या अभिनेत्रीही तिच्या अभिनयाने प्रभावित झाल्या होत्या. तिची चित्रपटांमधील छोटी भुमिकाही प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडायची. चला तर मग जाणुन घेऊ या अभिनेत्रीचा चित्रपटातील प्रवास…

चित्रपटांमध्ये मनोरमा (Manorama) आपल्या एक्सप्रेशन्सने सगळ्यांना मात देत. निर्मात्यांना या अभिनेत्रीला (actress) त्यांच्या चित्रपटात कास्ट करायचे होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, लोक त्यांच्या स्मार्ट फोनवरून विविध प्रकारचे इमोजी पाठवून त्यांच्या भावना व्यक्त करतात. पण त्या काळात इतकं तंत्रज्ञान प्रगत नव्हतं. पण ही अभिनेत्री तिच्या खऱ्याखुऱ्या एक्सप्रेशनने तिची ओळख बनवली. मनोरमाचे भाव तिच्या व्यक्तिरेखेला एक वेगळेपण देत असत. तिने काम केलेल्या चित्रपटातील त्यांचे डायलॉग त्यांच्या हावभावांना खुप साजेसे होते.

मनोरमा या अभिनेत्रीने तीच्या अभिनय प्रवासात एकूण 160 चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. 2005 मध्ये आलेल्या ‘वॉटर’ (water) चित्रपटात तीने शेवटची भूमिका साकारली होती. तीने 6 दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. पण आज ती या जगात नसली तरी तीने साकारलेली व्यक्तिरेखा लोकांच्या मनात कायम जिवंत राहतील. लोक तीला कधीच विसरणार नाहीत.

एकामागून एक अनेक हिट चित्रपटांमध्ये (hindi cinema) त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली होती. आपल्या अभिनय प्रवासात त्याने ‘सीता और गीता’, ‘एक फूल दो माली’, ‘दो कलियां’, ‘हाफ तिकीट’, ‘दस लाख’, ‘झनक-झनक पायल बाजे’, ‘मुझे जीने दो’, ‘मेहबूब की’. ‘मेहंदी’, ‘कारवां’, ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘लावारीस’ सारख्या चित्रपटात काम केले. (60 years Actress Manorama expression queen in film industry)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
घरी परतताच उपविजेत्या शिव ठाकरेचे जंगी स्वागत, एकदा व्हिडिओ पाहाच
डायरेक्टरने खूप मनवलं, तरीही समंथा अडली; ‘पुष्पा 2’मध्ये ‘तसलं’ काम करण्यास थेट दिला नकार

हे देखील वाचा