Thursday, April 18, 2024

हार्दिक आणि नताशाच्या लग्नात मुलानेही लुटला नाचण्याचा आनंद, पाहा फोटो

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस, या दिवशी प्रत्येक जण आपले प्रेम व्यक्त करत असतात. पण प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने त्याच्या पत्नीसोबत पुन्हा लग्न करुन अनोख्या पद्धतीने प्रेम व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत एक खास पोस्ट केली आहे.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) यांंनी 14 फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ला राजस्थान (Rajasthan) येथील उदयपूर (Udaipur) येथे पुन्हा लग्न (wedding) केले आहे. लग्नादरम्यान हार्दिक पंड्याने काळ्या रंगाचा सूट, तर नताशा स्टॅन्कोविकने पांढरा गाऊन परिधान केला होता. दोघांनी पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या शपथेची पुनरावृत्ती करून या प्रेमाच्या बेटावर व्हॅलेंटाईन डे साजरा केला. आमचे प्रेम साजरे करण्यासाठी आमचे कुटुंब आणि मित्र आमच्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे आम्ही खरोखरच धन्य आहोत.”

हार्दिक आणि नताशा 1 जानेवारी 2020 रोजी क्रूझवर प्रपोज केले आणि त्यानंतर दोघांनी साखरपुडा केला. जुलै 2020 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्यांना एक मुलगाही आहे. आता जेव्हा या जोडप्याने पुन्हा लग्न केले तेव्हा, त्यांचा मुलगा अगस्त्य देखील उपस्थित होता. हार्दिक आणि नताशाच्या लग्नात मुलानेही नाचण्याचा आनंद लुटला. नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पंड्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते दिसत आहे. त्याचबरोबर या जोडप्याच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. (hardik-pandya-and-natasha-natasha-stankovic-wedding-again-at-rajasthan-udaipur-photo-viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कपूर खानदानातील असूनही एकेकाळी रणधीर कपूर यांनी केला होता हलाखीच्या परिस्थितीचा सामना मुलींची फी द्यायला पण…
वाढदिवस विशेष : भारतीय इतिहासाला नवीन ओळख देणारा बॉलिवूडमधील मराठमोळा चेहरा म्हणजे आशुतोष गोवारीकर

हे देखील वाचा