Sunday, June 23, 2024

रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रणवीर सिंगचा ‘८३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत मागील अनेक दिवसापासून चर्चा चालू होत्या. सगळेजण वाट पाहत होते की, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख चित्रपटगृह खुली झाल्यानंतर घोषित केली आहे. या टिझरमध्ये भारतीय क्रिकेटचा इतिहास दाखवला आहे. हा टिझर पाहून तुम्हाला भारताचा तो क्षण आठवेल, जेव्हा भारताने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता.

रणवीर सिंगच्या ‘८३’ या चित्रपटाचा टिझर रिलायन्स एन्टरटेन्मेंटच्या यूट्यूब चॅनलवर शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) प्रदर्शित केला आहे. ५९ सेकंदांच्या या टिझरमध्ये क्रिकेटच्या मैदानाची झलक दाखवली आहे. यात भारताचा तो सामना दाखवला आहे, ज्या सामन्याने इतिहास रचला होता. टिझरमध्ये आपण पाहू शकतो की, स्टेडियममध्ये गर्दी आहे आणि तेव्हाच फलंदाज बॉल मारतो त्यावेळी दोन खेळाडू तो बॉल झेलण्याचा प्रयत्न असतो. ज्यावेळी हे दोन खेळाडू एकामेकांजवळ पोहचतात तेव्हा ट्रेलर संपतो. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे. (83 movies teaser out a glimpse of the historical moment of Indian cricket)

रणवीर सिंगच्या ‘८३’ या चित्रपटाची कहाणी तेव्हाची आहे, जेव्हा भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. १९८३ मधील विश्वचषकात भारताने जो विजय मिळवला होता. तो संघर्षमय प्रवास या चित्रपटात दाखवला जाणार आहे. या चित्रपटासाठी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. निर्मात्यांनी यासाठी भारतीय क्रिकेट संघाची देखील मदत केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. या चित्रपटावर गेले ३ वर्ष काम चालू आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात अनेक कलाकार काम करणार आहेत. यामध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, हार्डी संधू, ताहीर भसीन, एमी विर्क, पंकज त्रिपाठी, सकिब सलीम, चिराग पाटील, धैर्य करवा, जतिन सरना आणि बोमन इराणी हे कलाकार आहेत. हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम यांसारख्या अनेक भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ३० नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा