कलाकार चर्चेत राहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. जसे की, वादग्रस्त वक्तव्य करणे किंवा बोल्ड अंदाजामुळे सर्वांचे लक्ष वेधणे. मात्र, आता जो अभिनेता चर्चेत आहे, त्याने सर्व हद्द पार केल्या आहेत. हा अभिनेता इतर कुणी नसून दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आणि अभिनेता अक्षय खन्ना याचा भाऊ राहुल खन्ना आहे. राहुलने सोशल मीडियावर जबरदस्त फोटो शेअर केला आहे, ज्याने एकच खळबळ माजली आहे.
राहुल खन्ना (Rahul Khanna) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा न्यूड फोटो (Rahul Khanna Nude Photo) शेअर केला आहे. या फोटोत तो कपड्यांविना दिसत आहे. मात्र, त्याने यावेळी आपल्या हातात उशी घेतल्याचे दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर येताच जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, यापूर्वीही राहुलने कपड्यांविना फोटो शेअर केले आहेत.
राहुल खन्नाचे लेटेस्ट न्यूड फोटोशूट
राहुल खन्ना याने इंस्टाग्रामवर एक न्यूड फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो सोफ्यावर बसून कॅमेऱ्यासाठी पोझ देताना दिसत आहे. तसेच, त्याच्या चेहऱ्यावर हास्यदेखील आहे. याव्यतिरिक्त त्याने पायात मोजे आणि बूट परिधान केले आहेत. राहुल याने हा फोटो शेअर करत भन्नाट कॅप्शनही दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “असे काही आहे, जे मी बऱ्याच दिवसांपासून लपवून ठेवले आहे. मात्र, आता वेळ आली आहे, त्याबद्दल माहिती देण्याची. उद्या मोठा धमाका करण्यासाठी माझ्यासोबत जोडले राहा.”
View this post on Instagram
त्याच्या या फोटोवर अभिनेत्री मलायका अरोरा हिने “सोफा छान आहे,” अशी कमेंट केली आहे. तसेच, नेहा धुपिया हिने “सॉक्स छान आहेत,” असे म्हटले आहे. दुसरीकडे, अभिनेत्री दिया मिर्झा हिने “सोफा हा खूप छान आहे,” असे म्हटले आहे.
राहुल खन्नाने यापूर्वीही शेअर केला आहे न्यूड फोटो
खरं तर, न्यूड फोटो शेअर करण्याची राहुलची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी राहुलने सन फेब्रुवारी २०२०मध्ये आपला एक न्यूड फोटो शेअर केला होता. या फोटोत तो बाथरोबमध्ये आरशापुढे उभा राहिलेला दिसत होता. राहुलच्या त्या फोटोनेही त्यावेळी सोशल मीडियाचे तापमान वाढवले होते.
View this post on Instagram
राहुलच्या सिनेमांबाबत बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत मोजक्याच सिनेमात काम केले आहे. त्यामध्ये ‘अर्थ’ आणि ‘वेक अप सिड’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अबब! अवघ्या काही सेकंदाच्या जाहिरातीसाठी कलाकार घेतात ‘इतके’ मानधन, आकडा पाहून होतील डोळे पांढरे
काटा किर्रर्र! सर्वाधिक रोमान्सने भरलेले गाणे घेऊन आला खेसारी, अर्शीसोबतच्या केमिस्ट्रीने वेधले लक्ष










