बॉलिवूडमध्ये अशा फार कमी अभिनेत्री असतील, ज्यांना नेहमीच हॉट दिसणे आवडत नाही. यामध्ये जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) नावाचाही समावेश आहे. मात्र, तिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्यावर नेहमीच ‘हॉट’ दिसण्याचे दडपण येत नाही. त्यामुळेच तिने आपला जिम लूक साधा ठेवला आहे. मात्र, तिच्या साध्या लूकमध्येही एका विशिष्ट ऍंगलने फोटो काढले जात असल्याबद्दल, तिने चिंता व्यक्त केली आहे. याबाबत तिने सांगितले की, काही कारणास्तव लोक मला जिममध्ये येताना किंवा जिममध्ये जाताना पाहतात.
असे काही दिवस असतात, जेव्हा तिला फक्त कम्फर्टेबल दिसायचे असते. मात्र, अभिनेत्रीने सांगितले की एक गोष्ट त्रासदायक आहे. ती म्हणजे कोणाचेही फोटो एका विशिष्ट ऍंगलने काढले, तर ते अश्लील दिसतात. जान्हवी म्हणाली की, जर लोकांना वाटत असेल की, ती सुंदर आणि हॉट आहे, तर तिला काही फरक पडत नाही. पण जर कोणी तिला अश्लील मानत असेल, तर तिला फरक पडतो. (janhvi kapoor is worried about being called vulgar)
कम्फर्टनुसार कपडे घालते जान्हवी
जान्हवीने सांगितले की, “कोणतीही मुलगी अश्लील दिसण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडत नाही. काहीवेळा तुमचा फोटो विशिष्ट पद्धतीने काढला जातो, मग लोक तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहतात आणि तुमच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्या वेळी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कपडे निवडले नसले तरीही.”
जान्हवीचे करियर
जान्हवी कपूरने 2018 साली ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यामध्ये ती ईशान खट्टरसोबत दिसली होती. यानंतर ती ‘गुंजन सक्सेना’, ‘रुही’ आणि ‘घोस्ट स्टोरीज’मध्ये दिसली. आता लवकरच तिचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती वरुण धवनसोबत ‘बवाल’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमारने लेहेंगा परिधान करुन दिला लाईव्ह परफॉर्मन्स; युजर्स म्हणाले, ‘हे बघायचे बाकी…’
घटस्फोटानंतर पतीनं दुसरा संसार थाटला, पण सिंगल मदर बनून बॉलिवूडच्या या अभिनेत्री करतायेत मुलांचा सांभाळ, पाहा कोण कोण यादीत