Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड अक्षय कुमारने लेहेंगा परिधान करुन दिला लाईव्ह परफॉर्मन्स; युजर्स म्हणाले, ‘हे बघायचे बाकी…’

अक्षय कुमारने लेहेंगा परिधान करुन दिला लाईव्ह परफॉर्मन्स; युजर्स म्हणाले, ‘हे बघायचे बाकी…’

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या इंटरनेशनल टूर ‘द एंटरटेनर्स‘मुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेता सोनम बाजवा, दिशा पटानी, नोरा फतेही, अपारशक्ती खुराना आणि मौनी रॉयसोबत विमानतळावर स्पाॅट झाला हाेता. अशात आता या टूरचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये अक्षय आणि नोरा ‘ऊं अंटावा’ वर डान्स करताना दिसत आहेत.

तर झाले असे की, शुक्रवारी (दि.3 मार्च)ला कलाकारांनी अमेरिकेतील अटलांटा येथे पहिला परफॉर्मन्स दिला. यादरम्यान अक्षय (akshay kumar) आणि नोरा (nora fatehi) यांनी ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’ ते ‘ऊ अंटावा’ आणि ‘लाल घाघरा’वर जबरदस्त डान्स केला. यावेळी अक्षय आणि नोरा अल्लू अर्जुन आणि सामंथाच्या हुक स्टेपला फॉलो करताना दिसले. त्यासाेबतच अक्षय कुमार ‘लाल घाघरा’ या गाण्यावर लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसला. मात्र, साेशल मीडिया युजर्सला हे अजिबात आवडले नाही आणि त्यांनी अभिनत्याला जाेरदार ट्रोल केले.

अक्षय कुमारला लाल रंगाच्या लेहेंग्यात डान्स करताना पाहून एका युजरने ट्राेल करत लिहिले की, ‘हे बघायचे बाकी होते.’, तर आणखी एकाने लिहिले, ‘अक्षय कुमार त्याच्या वयानुसार कधी वागेल.’ अशात एका युजरने लिहिले, ‘अक्षयने या वाईट गोष्टी करणे थांबवले, तर तो हिट होईल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मंडळी, या कलाकारांचा लाइव्ह परफॉर्मन्स 3 मार्चला अटलांटा, 8 मार्चला डॅलस, 11 मार्चला ऑरलँडो आणि 12 मार्चला ऑकलंडमध्ये असेल. पहिला परफॉर्मेंस 3 मार्च रोजी झाला. यावेळी अभिनेत्यासाेबत नोरा फतेही, सोनम बाजवा, मौनी रॉय आणि दिशा पटनी देखील हाेते.

अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेता ‘ओएमसी 2’, ‘हेरा फेरी 3’, ‘सुरराई पुत्रू’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि ‘छत्रपती शिवाजीवरील मराठी चित्रपटात दिसणार आहे.(bollywood actor akshay kumar and nora fatehi dance actor trolled for dancing wearing a lehenga)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच
नवाजुद्दीनच्या मुलांना रस्त्यावर रडताना पाहून भावाने केले ट्विट; म्हणाला, ‘बच्चे को तो बक्श दो…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा