Friday, December 1, 2023

घटस्फोटानंतर पतीनं दुसरा संसार थाटला, पण सिंगल मदर बनून बॉलिवूडच्या या अभिनेत्री करतायेत मुलांचा सांभाळ, पाहा कोण कोण यादीत

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. अभिनेत्रींनी लग्न तर केले पण फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर घटस्फोट आणि ‘सिंगल मदर’ म्हणून आलेली जबाबदारी. तरी या अभिनेत्रींनी दुसरे लग्न न करता ‘सिंगल पॅरेंटस’ म्हणुन मुलांची जबाबदारी उत्तम रित्या सांभाळत आहे. पण काही अभिनेत्रींच्या पतीने मात्र घटस्फोटानंतर दुसरं लग्न करत नवीन संसार थाटला. आज अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करत आहेत.

एक काळ असा होता, जेव्हा संगीती बिजलानी आणि अभिनेता सलमान खान यांच्या रिलेशनशिपच्या तुफान चर्चा रंगल्या. पण अभिनेत्रीने माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासोबत लग्न केलं. जवळपास 14 वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी 2010 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 62 व्या वर्षी अभिनेत्री एकटी आयुष्य जगत आहे. तिने अभिनेता सलमान खान याच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहिले होते.

‘परदेस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर एका रात्रीत महिमा चौधरी हिला लोकप्रियता मिळाली. काही सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर महिमाने बॉबी मुखर्जी यांच्या सोबत 2006 साली लग्न केले. पण त्यांचे नाते फार काळ टिकु शकले नाही. त्यानंतर या अभिनेत्रीने मुलगी आर्यना चौधरी हिचा एकटीने सांभाळ केला.

मोठ्या पडद्यावर भरभरुन यश मिळाले असल तरी, खासगी आयुष्यात मात्र करिश्मा कपूर हीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. दोन मुलांचा जन्म झाल्यानंतर करिश्मा आणि संजय कपूर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर संजन यांनी लग्न केलं, पण करिश्माने मात्र मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करत आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हृतिकचे अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांना उधान आले होते. घटस्फोटानंतर दोन्ही मुलं सुझान हिच्याकडे राहत आहेत. घटस्फोटानंतर देखील हृतिक रोशन आणि सुझान महत्त्वाच्या क्षणी मुलांसोबत असतात. (bollywood-actress-karisma-kapoor-to-mahima-chaudhary-living-as-single-mother)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! राग अनावर झाल्याने सलमान खानने ‘या’ दिग्दर्शकाच्या तोंडावर फेकून मारली डायरी, वाचा संपूर्ण प्रकरण?
‘रियल पुलिस ऑफ बॉलीवुड’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्याचा संघर्षमय जीवनाचा प्रवास, एकदा वाचाच

हे देखील वाचा