प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी याने त्याच्या चाहच्यांसाठी एक धक्का दिला आहे. अदनान सानी याने मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. त्याचबरोबर फक्त एक पोस्ट बाकी आहे. ज्यामध्ये ‘गुडबाय’ असे लिहिलेले आहे.
https://www.instagram.com/tv/CgLwzDxLwMj/?utm_source=ig_web_copy_link
अदनानने अचानक सर्व पोस्ट डिलीट करून सोशल मीडियाचा निरोप घेतल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच त्याच्या या कृतीबाबच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. खरेतर, अदनान सामीने त्याची इंस्टाग्राम पोस्ट हटवून फक्त एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ पोस्टमध्ये काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अलविदा लिहिले आहे. अदनान सामीचे इंस्टाग्रामवर 6 लाख 72 हजार फॉलोअर्स आहेत. ( Adnan Sami deleting all Instagram posts and writes alvida after that fans worried )
अधिक वाचा –
देवेंद्र फडणवीसांना कधी गाणं गाताना पाहिलंय का? कैलाश खेरने शेअर केलेला हा Video बघा