Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड संभावना सेठला गाठलंय ‘या’ भयंकर आजाराने, सांगताना ढसाढसा रडली अभिनेत्री

संभावना सेठला गाठलंय ‘या’ भयंकर आजाराने, सांगताना ढसाढसा रडली अभिनेत्री

‘बिग बॉस सीझन २’ मध्ये सहभागी झालेली स्पर्धक आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संभावना सेठला (Sambhavna Seth) संधिवात झाला आहे. अभिनेत्रीने स्वत: कॅमेऱ्यासमोर येऊन या आजाराचा खुलासा केला आहे. आपल्या तब्येतीची समस्या सांगत तिने ट्रोललाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर, सोशल मीडियावर लोक वजन वाढवण्यावरून संभावनाला ट्रोल करत होते.

आपली व्यथा मांडताना अभिनेत्री कॅमेऱ्यावर रडली. संभावनाने तिच्या यूट्यूब चॅनलवर हा भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘धीर धरा आणि चांगले उपचार घ्या,’ असा सल्ला चाहते तिला देत आहेत. (tv actress sambhavna seth suffering from rheumatoid arthritis)

संभावनाने सांगितले की, सध्या ती संधिवात या धोकादायक आजाराशी झुंज देत आहे. संभावनाने एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये, संभावना भावूक झाली आणि IVF प्रक्रियेपासून ते संधिवातापर्यंत सर्व गोष्टींवर ती उघडपणे बोलली. या आजारामुळे तिला चालण्यास त्रास होत असल्याचे तिने सांगितले आहे. तिच्या हात-पायांमध्ये नेहमी सूज, वेदना, जडपणा जाणवत असतो. कॅमेरासमोर आपल्या आजाराविषयी सांगताना संभावना खूपच भावुक झाली.

एवढेच नाही, तर ती थंडीत राहू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी तिला नेहमी सौम्य उबदार तापमानाची आवश्यकता असते. संभावनाने सांगितले की, तिला अनेक वर्षांपूर्वी संधिवात झाला होता, जो कालांतराने औषधांनी बरा झाला. मात्र पुन्हा एकदा तिला त्याची लक्षणे जाणवू लागली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा