‘मी आत्ताच पोलिसात जाते…’, कोरोनाच्या काळात औषधांचा काळाबाजार बघून भडकली अभिनेत्री संभावना सेठ


भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठ हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री संभावना सेठ ही कोरोना साथीच्या औषधांचा काळा बाजार करणाऱ्यांना झापताना दिसली आहे.

अभिनेत्रीने संभावना सेठ तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांशी भांडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे, “मी सकाळपासूनच लोकांना मदत करण्यात व्यस्त आहे. मी तुमच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना फोन केला, आणि आपण मला पुन्हा पैसे मागत आहात. मी आत्ताच तुमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करायला जात आहे, आपण कोरोनाला असे हरवणार आहोत का?” अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संभावना सेठने माध्यमाशी बोलताना सांगितले की, “मी आणि माझा पती अविनाश गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाशी लढणार्‍या लोकांना मदत करत आहेत. अशा परिस्थितीत जर एखाद्याने वैद्यकीय उपचारांशी संबंधित, कोणत्याही कामात समस्या निर्माण केल्या, किंवा औषधांचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला, तर कोणाचेही डोके खराब होईल.”

या व्हिडिओबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “आज, मी आणि माझे पती सकाळपासूनच एका पेशंटसाठी, ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात गुंतलो आहोत. परंतु असे दिसते की, फोनच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या व्यक्तीला, फोन कोणी केला आहे याची माहिती देखील नव्हती. याचा फायदा घेत आम्ही एका व्यक्तीला, त्याच्याकडे ऑक्सिजन घेण्यासाठी पाठवले होते, त्या अप्रामाणिक व्यक्तीने मी पाठवलेल्या व्यक्तीकडूनही पैसे घेतले, आणि कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही. त्यानंतर माझा राग मला रोखता आला नाही, आणि मी रागाच्या भरात खूप बोलले.”

अभिनेत्री संभावना सेठ पुढे म्हणाली की, “अशा लोकांना अजिबात लाज वाटत नाही. आज या महामारीत कोट्यवधी लोकांचे प्राण गमावले आहेत, परंतु अद्याप त्याना फक्त पैसे महत्त्वाचे आहेत. त्यांची माणुसकी कुठे आहे? अशा लोकांनी तुरुंगात जायला हवे. हा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडिया अकाउंटवर फक्त हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी शेअर केला आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनामधून बरी झाल्यानंतर पाहा काय म्हणतेय ‘शालू’, फेसबुकवर शेअर केली खास पोस्ट!

-कोरोनाविरुद्धच्या लढाईत विराट कोहली आणि अनुष्का शर्माची उडी, आपल्या मोहिमेत सहभागी होण्याचे चाहत्यांना केले आवाहन

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक


Leave A Reply

Your email address will not be published.