Friday, April 19, 2024

‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबरला निधन झाले. त्यानंतर त्याच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत ३ सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. संभावना सेठसह अनेक टीव्ही आणि बॉलिवूड कलाकार येथे पोहोचले होते. सिध्दार्थ शुक्लाच्या मृत्यू आणि अंत्यसंस्काराबद्दल संभावनाने एक व्लॉग बनवला होता. व्लॉग समोर येताच नेटकरी तिला भयंकर ट्रोल करत आहेत. नेटकऱ्यांचा राग पाहिल्यानंतर आता संभावनाने अनेक ट्वीट करून यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

स्पष्टीकरण देताना संभावना म्हणाली, “चाहत्यांच्या व्यतिरिक्त कलाकार असूनही आम्हाला चाहत्यांसारखे सुशांत सिंग राजपूतचे मित्र आणि कुटुंबाविषयी जाणून घेऊ वाटत होते. यासारखचं सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांनाही कुटुंब आणि मित्रांबद्दल जाणून घ्यायचे होते. त्यांच्याकडे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

दुसऱ्या ट्वीटमध्ये संभावनाने लिहिले, “सिद्धार्थच्या चाहत्यांना मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे अंत्यसंस्काराची सामान्य माहिती सांगणे गुन्हा नाही. जोपर्यंत तुम्ही आतले फोटो आणि व्हिडिओ लीक करत नाही आणि मी हे केले नाही. जे लोक त्यांच्या ट्वीट्सने ओव्हरस्मार्ट होत आहेत, त्यांनाही सोशल मीडियावर स्क्रोल करुन जाणून घ्यायचे आहे, की तिथे काय चालले होते.”

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “जे लोक मला व्लॉग बनवण्यासाठी दोष देत आहेत, त्यांनी आपला द्वेष बाजूला ठेवून व्हिडिओ पाहावा. मी तेथील एकही फोटो किंवा व्हिडिओ दाखवला नाही. जसे इतरांना दोष देणे हे तुमचे काम आहे, त्याचप्रमाणे व्लॉगिंग, अभिनय आणि डान्स हे माझे काम आहे.”

पुढे स्पष्टीकरणात अभिनेत्री म्हणाली, “मला पॅपराजीला पैसे देऊन जिम, शॉपिंग मॉल, अंत्यसंस्कार यासारख्या ठिकाणी स्वत:ला फॉलो करण्यापेक्षा, यू ट्यूबवर माझ्या भावना पोस्ट करणे चांगले वाटते.”

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, गौहर खान, विकास गुप्ता सारखे अनेक कलाकार अंत्यसंस्कारासाठी पोहोचले आणि माध्यमांना मुलाखती देणाऱ्या कलाकारांवर चिडून वक्तव्ये केली आहेत. या विधानांमध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव नव्हते, परंतु त्यांचा इशारा संभावना सेठ आणि राहुल महाजन यांच्याकडेच असावा.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

हे देखील वाचा