Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या ब्रेकअपवर वडील जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया चर्चेत

बॉलिवूडमध्ये नात्यांचे समीकरण बिघडत चालले असले तरी काही नाती अशी आहेत की ज्यांच्या तोडण्याने दोनच नाही तर लाखो हृदये तुटतात. बॉलिवूडच्या क्यूट कपलपैकी एक टायगर श्रॉफ  आणि दिशा पटानी  यांच्या ब्रेकअपच्या अफवेमुळे सध्या त्यांच्या चाहत्यांचीही तीच अवस्था झाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या टायगर आणि दिशा यांच्यातील नात्याचा आता ‘अंत’ झाल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये जोरात सुरू आहे. रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, गेल्या वर्षी दोघांमध्ये काही चांगले झाले नाही आणि अखेर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

टायगर-दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफने केलं हे वक्तव्य
टायगर (Tiger Shroff) आणि दिशाच्या (Disha Patani) ब्रेकअपच्या अफवेदरम्यान जॅकी श्रॉफचे (Jackie Shroff ) हे वक्तव्य समोर आले आहे. दिशाबद्दल तो नेहमीच एका कुटुंबाप्रमाणे बोलत असतो. माध्यमांशी संवाद साधताना जॅकी म्हणाले, “ते नेहमीच मित्र होते आणि अजूनही मित्र आहेत. मी दोघांना एकत्र बाहेर जाताना पाहिले आहे. मी माझ्या मुलाच्या प्रेम जीवनाला ट्रॅक नाही करू शकत नाही. पण मला वाटते की ते जवळचे मित्र आहेत. कामाव्यतिरिक्त ते एकत्र वेळ घालवतात.”

ते त्यांच वैयक्तिक आयुष्य आहे
जॅकी यांनी असेही सांगितले की, हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे आणि पुढे कसे जायचे हा त्यांचा निर्णय आहे. ते म्हणाले, “बघा, त्यांना एकत्र राहायचे की नाही हे त्यांच्या हातात आहे. ते एकमेकांना पात्र आहेत की नाही. ही माझी आणि माझ्या पत्नीच्या (आयशा) प्रेमकहाणीसारखी त्यांची प्रेमकथा आहे. आमच्या दोघांचेही दिशासोबत चांगले सबंध आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे ते दोघे एकत्र आनंदी आहेत. ते भेटतात, बोलतात.”

वृतांमध्ये टायगर श्रॉफच्या मित्राच्या हवाल्याने ब्रेकअपची बातमी खरी असल्याचे सांगितले जात आहे. मित्राच्या म्हणण्यानुसार, ब्रेकअपमुळे टायगरने कामावर परिणाम होऊ दिला नाही. पूर्वीप्रमाणेच, तो त्याच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो. सध्या दिशा लंडनमध्ये तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी ती सध्या तिचा आगामी चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

चाहत्यांना मोठा धक्का, ‘या’ कारणामुळे बंद होणार दाक्षिणात्य चित्रपटांची शूटिंग

चाळीस वर्षापूर्वीची ‘ती’ एक चूक पडली महागात,आजही यातना भोगत आहेत महानायक अमिताभ बच्चन

‘या’ आजाराने त्रस्त आहे संभावना सेठ, व्हिडिओ शेअर करून दिली माहिती

हे देखील वाचा