Saturday, January 11, 2025
Home बॉलीवूड बिपाशा बासू अन् करण सिंग ग्रोव्हर होणार आहेत पालक? लवकरच करू शकतात अनाउंसमेंट

बिपाशा बासू अन् करण सिंग ग्रोव्हर होणार आहेत पालक? लवकरच करू शकतात अनाउंसमेंट

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांची जोडी बी टाऊनची सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. दरम्यान, या कपलबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ज्यानुसार बिपाशा कदाचित गर्भवती आहे आणि ती लवकरच तिच्या पहिल्या मुलाची घोषणा करू शकते. रिपोर्ट्सनुसार, करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू काही महिन्यांनंतर आई-वडील होण्यासाठी तयार आहेत. 

आई-वडील होण्यासाठी उत्सुक आहेत करण-बिपाशा
खरं तर, गेल्या अनेक दिवसांपासून बिपाशा बासू आई होणार आहे का?, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, पिंक व्हिलाच्या या रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की, बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हरच्या जवळच्या सूत्राने सांगितले आहे की, हे दोन्ही सुपरस्टार लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाची घोषणा करणार आहेत. यामुळे करण-बिपाशा आई-वडील होण्यासाठी खूप आनंदी आणि उत्सुक आहेत. ज्या अंतर्गत बिपाशा बासू कधीही तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करू शकते. मात्र आताच हे सांगणे घाईचे ठरेल की, करण आणि बिपाशाच्या घरी खरंच एक छोटा पाहुणे येणार आहे की नाही. (bipasha basu and karan singh grover likely announce about baby)

‘या’ चित्रपटापासून झाली बिपाशा-करणच्या प्रेमकथेला सुरुवात
महत्त्वाचे म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांनी २०१५ साली आलेल्या ‘अलोन’ या हॉरर चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर या दोन्ही कलाकारांमधील जवळीक वाढू लागली. ज्यामुळे करण आणि बिपाशा अनेक प्रसंगी स्पॉट होऊ लागले. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०१६ मध्ये करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एकमेकांशी लग्न केले. अशा परिस्थितीत, लग्नाच्या एकूण ६ वर्षानंतर आता हे दोन जोडपे पालक बनणार असल्याची बातमी समोर येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा