×

Birthday Special | बिपाशापूर्वी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत थाटलाय करणने संसार, ‘अशी’ राहिली कारकीर्द

बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी दोन नव्हे तर तीन वेळा लग्न करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. अशा कलाकारांपैकी एक बॉलिवूड अभिनेता आहे जो त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहिला आहे. तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा हँडसम हंक करण सिंग ग्रोव्हर होय (Karan Singh Grover). करण हा टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘दिल मिल गए’ या मालिकेत त्याला चांगलीच पसंती मिळाली होती. त्याने ‘अलोन’, ‘हेट स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. करण बुधवारी (२३ फेब्रुवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

अभिनेत्याच्या कारकिर्दीपेक्षाही तो त्याच्या लग्नांमुळे चर्चेत राहिला आहे. करणने (Karan Singh Grover) २०१६ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूशी लग्न केले. दोघांची गोड केमिस्ट्री आहे. चाहत्यांना ही जोडी खूप आवडते. मात्र बिपाशा बसूच्या आधी करणने दोनदा लग्न केले होते. चला तर मग त्याच्या पत्नींबद्दल जाणून घेऊया.

श्रद्धा निगम
करण आणि श्रद्धा २००८ मध्ये विवाहबद्ध झाले. एका कॉमन फोटोग्राफर मित्राच्या माध्यमातून दोघांची भेट झाली. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि २००९ मध्ये दोघेही वेगळे झाले. श्रद्धा निगमने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी हे लग्न मोडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. खूप प्रयत्न करूनही हे लग्न टिकले नाही.” २०१२ मध्ये श्रद्धाने टीव्ही अभिनेता मयंक आनंदसोबत लग्न केले.

जेनिफर विंगेट
यानंतर करण जेनिफर विंगेटच्या प्रेमात पडला. ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन दोन्ही जोडीला चांगलीच पसंती मिळाली. २०१२ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघेही फक्त दोन वर्षे एकत्र राहिले. करण सिंग ग्रोव्हरची दुसरी पत्नी जेनिफर विंगेटने अभिनेत्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. करणसोबतचे लग्न मोडल्याची बातमी खुद्द जेनिफर विंगेटने सोशल मीडियावरून दिली होती.

बिपाशा बासू
करण आणि बिपाशाने (Bipasha Basu) ‘अलोन’ चित्रपटात एकत्र काम केले होते. यादरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. एका मुलाखतीत बिपाशाने करणच्या अयशस्वी लग्नांबद्दल बोलताना म्हटले होते की, “अयशस्वी लग्न म्हणजे ती व्यक्ती चुकीची आहे असा होत नाही, त्यामुळे त्याची निंदा व्हायला हवी असे नाही.”

बिपाशा बसूने २००१ मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘अजनबी’ या सिनेमातून केली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारसोबत काम केले होते. याशिवाय बिपाशा बसूने ‘राज’, ‘फूटपाथ’, ‘ऐतबार’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. बिपाशा बासू बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिने शेवटचे २०१५ मध्ये ‘अलोन’ चित्रपटात काम केले होते.

बॉलिवूड आणि टीव्ही करिअर
करण सिंग ग्रोव्हरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. एमटीव्हीच्या युवा शो ‘कितनी मस्त है ये जिंदगी’मधून त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने स्टार वन मेडिकल ड्रामा ‘दिल मिल गए’ मध्ये डॉक्टरची भूमिका साकारली. जरी तो टीव्ही शो ‘कुबूल है’ सह घराघरात नाव बनला आणि अनेक रियॅलिटी शो आणि जाहिरातींमध्ये तो दिसला. टीव्हीवर छाप पाडल्यानंतर तो मोठ्या पडद्याकडे वळला. बिपाशा बासूच्या ‘अलोन’ या हॉरर चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ‘हेट स्टोरी ३’मध्ये करणने एका मिस्ट्री मॅनची भूमिका साकारली, ज्याचा पडद्यावर चांगला प्रभाव पडला.

हेही वाचा –

Latest Post