जॉन अब्राहमने बिपाशा बासूला वजन कमी करण्यासाठी ‘ही’ गोष्ट केली होती गिफ्ट, अभिनेत्रीने केला होता खुलासा

Actor John Abraham Gift Bipasha Basu This Thing Actress Reveal In Her Past Interview


अभिनेत्री बिपाशा बासूने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती आपला पती करण सिंग ग्रोव्हरसोबत सुखी आयुष्य जगत आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा अभिनेता जॉन अब्राहम आणि बिपाशाच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगायच्या. त्यांनी ‘जिस्म’, ‘एतबार’, ‘मदहोशी’, ‘गोल’ यांंसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसह ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही हिट होती. परंतु ९ वर्षांच्या दीर्घ रिलेशनशिपनंतर दोघांचेही ब्रेकअप झाले होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, जॉन आणि बिपाशा एकमेकांसोबत खूप खुश होते आणि लग्नही करणार होते. विशेष म्हणजे त्या दोघांनीही आपले नाते माध्यमांपासून कधीही लपवले नाही. सन २००५ मध्ये एका मुलाखतीदरम्यान स्वत: बिपाशाने तिच्या आणि जॉनच्या नात्याबद्दल चर्चा केली होती. त्यात तिने सांगितले होते की, तिच्या वाढदिवशी जॉनने तिला एक ट्रेडमिलही भेट म्हणून दिले होते. याचे कारण म्हणजे बिपाशाचे वजन खूपच वाढले होते.

बिपाशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘बंगाली जेवणाने माझे वजन खूप वाढले होते. मी एका पाठोपाठ एक अशा चित्रपटांमध्ये काम करत होते. त्यामुळे मी स्वत: वर लक्ष देऊ शकत नव्हते. शिस्तीच्या कमतरतेमुळे माझे वजन खूप वाढले होते. त्यानंतर मला जाणीव झाली की, मला स्वत: ला असे पाहायचे नाही. तुम्ही तुमच्या चुकांमधूनच शिकता. आता मी वर्कआऊट करते. असेही म्हणू शकता की, मी वर्कआऊटशिवाय राहूच शकत नाही.’

बिपाशाने हेही म्हटले होते की, “याचेे श्रेय जॉनलाही जाते. कारण त्याला माहिती होते की, माझ्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्याने माझ्या वाढदिवशी एक ट्रेडमिल (धावण्याची- चालण्याची मशीन) गिफ्ट केले होते. जेणेकरून मी घरीच वर्कआऊट करू शकेल. जॉन खूप सकारात्मक व्यक्ती आहे. मला त्यावेळी त्याच्यासारख्याच व्यक्तीची गरज होती.”

दुसरीकडे जॉन आणि बिपाशा तब्बल ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर सन २०१४ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. यानंतर जॉनने याच वर्षी प्रिया रुंचालसोबत आणि बिपाशाने सन २०१६ मध्ये करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्याचा मराठमोळा सिद्धू लहानपणापासून होता दिवाना; त्याच व्यक्तीबरोबर मिळाली काम करण्याची संधी

-‘पंचम दा’ यांच्या निधनाच्या ४ महिन्यांनंतर बँक लॉकरमध्ये सापडले ‘इतके’ रुपये, पाहून झाले होते सगळेच हैराण

-प्रसिद्ध गायक लकी अली यांचे निधन? जवळची मैत्रीण आणि अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण


Leave A Reply

Your email address will not be published.