छोट्या पडद्यावरील बिग बॉस या रिऍलिटी शोमधून जो चेहरा बाहेर पडतो, तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. सलमान खानच्या या शोमध्ये प्रसिद्ध टिक टॉक स्टार सोनाली फोगट दिसली होती. सोनालीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. टिकटॉकच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली ही अभिनेत्री आपल्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते. व्हिडिओ किंवा फोटो ती आपल्या चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत असते. आपला साडीमधील लूक असो वा एखादा वेस्टर्न लूक, तिच्या प्रत्येक लूकमधून ती कमालीची उठून दिसते. काही महिन्यांपूर्वी तीचे ‘कमर तेरी लेफ्ट राईट’ हे हरियाणवी गाणे सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय झाले होते. त्यानंतर ती आता पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.
हनी सिंगच्या ‘शोर मचेगा’ या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. तिच्यासोबत तिचा ट्रेनर देखील या व्हिडिओत नाचताना दिसत आहे. यात तिचे जबरदस्त मुव्ह दिसत असून ती एकदम बेभान होऊन नाचत आहे. तिने हा व्हिडिओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मिस्टर भूटान के साथ शोर मचेगा हुक स्टेप.” या व्हिडिओत तिने सलमान खानला सुद्धा टॅग केले आहे.
बिगबॉसच्या घरात सोनालीला वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री मिळाली होती. त्यात तिने चांगला खेळ केला होता. पण अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात ती अपयशी ठरली. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ती आपल्या आयुष्याचा पुरेपूर आनंद लुटताना दिसली होती. त्यानंतर तिने आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. सन २००८ मध्ये ती भारतीय जनता पार्टीत सामील झाली होती. सन २०१९ मध्ये निवडणूकीत तिचा पराभव झाला होता.
टिकटॉक स्टार बनण्याआधी ती एक वृत्तनिवेदिका होती. तिने हिसार दूरदर्शनवर काम केले आहे. ‘अम्मा’ या मालिकेत देखील ती अभिनय करताना दिसली हिती. टिक टॉक बंद पडल्यावर तिने इंस्टाग्रामवर आपले अकाउंट सुरू केले होते, ज्यात तिचे लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. एका हरियाणवी गाण्यातही ती दिसली होती. २०१६ साली तिच्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिचे पती सुद्धा राजकारणात सक्रिय होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा–
-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर