Thursday, November 14, 2024
Home बॉलीवूड ‘फ्लाय’ गाण्यातून पहिल्यांदाच आली बादशाह-शेहनाजची केमेस्ट्री चाहत्यांसमोर, पाहा युट्यूबर ट्रेंडिंगमध्ये असलेलं हे गाणं

‘फ्लाय’ गाण्यातून पहिल्यांदाच आली बादशाह-शेहनाजची केमेस्ट्री चाहत्यांसमोर, पाहा युट्यूबर ट्रेंडिंगमध्ये असलेलं हे गाणं

शेहनाज गिलला पंजाबची कतरीना म्हणून ओळखले जाते. बीग बॉस शोमुळे ती देशात लोकप्रिय झाली होती. बिग बॉसच्या घरातील तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. तिच्या निरागस व्यक्तीमत्त्वामुळे तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. ही अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तसेच तीचे सोशल मीडीयावर मोठे फॅन फॉलोविंग आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या आगामी प्रोजेक्ट्ची कायम माहिती देते. काही दिवसांपुर्वीही तीने अशीच एक घोषणा सोशल मीडियावर केली होती. बादशाहबरोबरील गाण्याची घोषणा तीने याच प्लॅटफॉर्मवरुन केली होती. हे गाणे काश्मिरमध्ये चित्रीत झाले होते. आता हेच गाणे रिलीझ झाले आहे. सोशल मीडियावर या गाण्याला प्रचंड हिट्स मिळत आहेत. शेहनाज पहिल्यांदाच बादशाहबरोबर काम करत आहेत. एकत्र स्क्रीन शेअर करण्याची या दोघांची ही पहिलीच वेळ. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या गाण्यात शेहनाज काश्मिरी लुकमध्ये दिसतेय. हे गाणे युट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

बादशाह आणि शेहनाज सोबतच उताना अमित हा सुद्धा या गाण्यात झळकला आहे. या गाण्याचे बोल खुद्द बादशाहने लिहिले आहे. त्याने आपल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे गाणे शेयर करून माझे ‘फ्लाय’ गाणे रिलीज झाले आहे, असे त्याने सांगितले. फार कमी दिवसात त्याच्या या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकवर्ग सुद्धा या गाण्याची तारीफ करताना चुकत नाही. याअगोदर बादशाहचे नॅशनल क्रश रश्मीका सोबत ‘टॉप टकर’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. अवघ्या चार तासात या गाण्याने युट्युबवर सर्वांनाच वेड लावले होते.

बिग बॉस नंतर शेहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाचे ‘भुला दुंगा’ हे गाणे प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ‘शोना शोना’ गाणे सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते.

शेहनाजने २०१५ साली मॉडेल म्हणून सिनेइंडस्ट्रीमध्ये काम सुरु केले होते. तिने २०१९ मध्ये पहिला पंजाबी चित्रपट केला होता, ज्यात तिच्यासोबत सरगुन मेहता, जोर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लन आदी कलाकार होते. या चित्रपटाचे नाव ‘काला शाह काला’ असे होते.याशिवाय अनेक पंजाबी चित्रपटात ती झळकली होतो. केवळ एक अभिनेत्री नव्हे तर प्रसिद्ध गायिका म्हणून सुद्धा ती ओळखली जाते.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा