Wednesday, February 19, 2025
Home भोजपूरी ‘सीरियल किसर’ इमरान हाशमीच्या ‘या’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री मोनालिसा, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

‘सीरियल किसर’ इमरान हाशमीच्या ‘या’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री मोनालिसा, व्हिडिओ होतोय जबरदस्त व्हायरल

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये भोजपुरी अभिनेत्री ‘मोनालिसा’ हिचाही समावेश होतो. ती आपले नवीन फोटो आणि व्हिडिओंनी चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. अनेकदा तिचा मजेशीर अंदाजही चर्चेचा विषय ठरतो. ही अभिनेत्री आपल्या डान्ससाठीही ओळखली जाते. तिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो जबरदस्त व्हायरल होत आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मोनालिसाने नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोनालिसा बॉलिवूडचा ‘सीरियल किसर’ इमरान हाशमीच्या नवीन ‘लुट गए’ गाण्यावर लिप सिंक करत थिरकताना करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

‘लुट गए’ हे गाणे प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल गायले आहे. या गाण्यावर बनवलेल्या व्हिडिओत मोनालिसा आपल्या बाल्कनीमध्ये लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तिने या व्हिडिओ पोस्ट करत “या गाण्यावर आम्ही तर  ‘लुट गए'” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

मोनालिसाबद्दल बोलायचं झालं, तर तिचे खरे नाव ‘अंतरा बिस्वास’ आहे. तिने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे भोजपुरीव्यतिरिक्त तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा जादू दाखवला आहे. तिने ‘मनी है तो हनी है’, ‘गंगा पुत्र’, ‘काफिला’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर ती स्टार प्लस चॅनेलवरील ‘नजर’ या मालिकेत ‘डायन’ची भूमिका साकारली आहे.

मोनालिसाला सर्वाधिक ओळख प्रसिद्ध टीव्ही शो ‘बिग बॉस’च्या १० व्या हंगामातून मिळाली होती. सध्या ती ‘नमक इस्क का’मध्येही काम करत आहे. या मालिकेच्या प्रचारासाठी ती ‘बिग बॉस’च्या १४ व्या हंगामातही गेली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विवेक ओबेरॉयच्या प्लेटमध्ये ऑम्लेटच्या जागी चक्क हेल्मेट! मजेशीर व्हिडिओ सोशलवर व्हायरल

हे देखील वाचा