बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आजकाल सोशल मीडियावर खूपच सक्रिय असल्याचे दिसत आहे. ती आपल्या आयुष्याशी निगडित अनेक घटनांचा खुलासा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसोबत करत असते. नुकताच श्रद्धाने एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, हा व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकतील. तिचा हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे.
श्रद्धा नुकतीच आपला मावस भाऊ प्रियांक शर्माच्या लग्नाला गेली होती. त्याच्या लग्नात तिने दिलखुलासपणे केलेल्या डान्सचा व्हिडिओ चाहत्यांना आकर्षित करत आहे. प्रियांकचे लग्न शजा मोरानी सोबत झाले आहे. त्यांनी ख्रिचन आणि हिंदू या दोन्ही पद्धतीने मालदीवमध्ये लग्न केले आहे. त्या दोघांनी फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केले होते.
त्यांच्या लग्नात श्रद्धाने खूपच एंजॉय केला आहे. या लग्नात ती पारंपरिक वेशात दिसून येते. तिने सोनेरी रंगाचा लेहंगा आणि ब्लाऊज घातला आहे. डोक्यावर पगडी आणि डोळ्यांवर काळा चष्मा घातला आहे. यामध्ये तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे.
श्रद्धाने ढोल नगाड्याच्या तालावर डान्स केला. तिने सलमान खानचे प्रसिद्ध गाणे ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मैं जावांगा’ या गाण्यावर चांगलेच ठुमके लावले आहेत.
प्रियांक हा श्रद्धाचा मावस भाऊ आहे. तो प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा आहे, तर शजा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक ‘करीम मोरनी’ यांची मुलगी आहे.
श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘नागीण’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरिया, आणि निर्माते अखिल द्विवेदी हे असणार आहेत. ती रणबीर कपूरसोबत देखील एका चित्रपटात काम करणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा–
-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर