बॉलिवूडला एकापेक्षा एक सिनेमे देणाऱ्या महेश भट्ट यांची गणना प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये होते. ते त्यांच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे, त्यांचे आणि वादाचे खूपच जुने नाते आहे. कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे, तर कधी कलाकारांनी लावलेल्या आरोपांमुळे महेश भट्ट यांना बदनामीचा सामना करावा लागला आहे. यामध्ये पाकिस्तानी अदाकारा मीरा हिच्या नावाचाही समावेश आहे. मीराने महेश भट्ट यांच्यावर शोषणाचा आरोप लावला होता, त्यामुळे तिला बॉलिवूडला रामराम ठोकावा लागला होता.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मीरा (Pakistani Actress Meera) हिने सांगितले की, तिने कोणत्याही दिग्दर्शकासोबत काम करू नये असे महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना वाटत होते. त्यांच्यामुळेच मीराने बॉलिवूड सोडले आणि जेव्हा परत बॉलिवूडमध्ये यायचा विचार केला, तर तिला येऊ दिले नाही.
सोपा नव्हता बॉलिवूडचा प्रवास
मीराने सांगितले की, “बॉलीवूडमध्ये काम करण्याचा अनुभव खूप छान होता. मला भारतीय प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले, पण बॉलिवूडचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या, पण मी हार मानली नाही. सुरुवातीच्या काळात बॉलिवूड माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होते. मी मुंबईत महेश भट्ट सोडून कोणाला ओळखत नव्हते. लोकांना ओळखायला खूप वेळ लागला. महेश भट्ट यांनी माझी इंडस्ट्रीशी ओळख करून दिली. मी महेशजींचा खूप आदर करायचे. ते माझे गुरू आणि मार्गदर्शक होते. माझ्या यशाचे श्रेयही मी त्यांनाच देईन.”
जेव्हा महेश भट्ट यांनी मारलेली मीराला चापट
“‘नजर’ या चित्रपटातून जेव्हा मी माझ्या फिल्मी करिअरला सुरुवात केली, तेव्हा मला राम गोपाल वर्मा, मणिरत्नम, सुभाष घई यांसारख्या अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या ऑफर आल्या, ज्यांना माझ्यासोबत काम करायचे होते. मात्र, महेश भट्ट यांना मी त्यांच्याशिवाय इतर कुणासोबत काम करावे, असे वाटत नव्हते. एका रात्री मी सुभाष घईंना भेटल्याचे महेशजींना सांगितल्यावर ते खूप संतापले, माझ्यावर ओरडले आणि दोन-तीन वेळा मला चापटही मारली,” असेही पुढे बोलताना मीरा म्हणाली.
‘आधी मुलगी आणि नंतर स्पेशल म्हणायचे’
महेश भट्ट यांच्या बदलणाऱ्या वृत्तीबद्दल बोलताना ती म्हणाली की, “मला माहिती नाही, पण ते खूप विचित्र गोष्टी बोलायचे. ते मला म्हणायचे की, ‘तू माझ्यासाठी मुलगी पूजासारखी आहेस. तुझ्यात आणि पूजात कोणताही फरक नाहीये.’ त्यानंतर परत ते म्हणायचे की, ‘मला तू खूप आवडते आणि तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस.’ मला हे सांगणे खूप कठीण आहे की, त्यांना माझ्याकडून नेमकं काय हवं होतं.”
‘महेशजींनी सर्व रस्ते बंद केले’
मीराने पुढे सांगितले की, “एकदा आमची भांडणे झाली, तेव्हा त्यांनी माझी माफी मागितली. त्यानंतर महेशजींनी मला सांगितले की, ‘मी आता तुझ्या अडचणी सोडवू शकत नाही, तू परत पाकिस्तानला गेलीस तर बरे होईल.’ मी गेले, पण मला परत यायचे होते, तेव्हा त्यांनी मला येऊ दिले नाही. आता माझ्यासाठी बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची कोणतीही आशा उरली नव्हती. त्यांनी माझे सर्व रस्ते बंद केले. मी खूप अस्वस्थ होते, माझी काय चूक होती, हे मी स्वतःला विचारायचे. मी आजपर्यंत महेशजींना समजून घेऊ शकले नाही.” मीराने हे सर्व टाईम्स ऑफ इंडिया वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
महेश भट्ट यांनी ‘सडक’, ‘दिल है के मानता नहीं’, ‘आशिकी’, ‘गुमराह’ यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जगातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण! दिया मिर्झाच्या मुलाने पहिल्यांदा म्हटले ‘आई’, मलायकाही झाली खुश
प्रियांकाचा आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल, बाथरूममध्ये करत होती ‘हे’ काम
देशाचा अभिमान आहे रणवीर सिंगची मेहुणी, भल्याभल्या अभिनेत्रींनाही पछाडण्याचा राखते दम