जगातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण! दिया मिर्झाच्या मुलाने पहिल्यांदा म्हटले ‘आई’, मलायकाही झाली खुश

प्रत्येक महिलेचे तिच्या मुलाबाळांवर प्रेम असते. ती त्याला लहानाचं मोठं करण्यात कष्ट घेते. तो जेव्हा बोलायला लागतो आणि त्याच्या तोंडून ‘आई’ हा शब्द बाहेर पडतो, तेव्हा तो क्षण प्रत्येक आईसाठी खूपच आनंदाचा असतो. असेच काहीसे आता बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिच्याबाबत घडले आहे. दियाने तिच्या मुलासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.

अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) ही सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. अभिनेत्रीने मागील वर्षीच मुलगा अव्यान याला जन्म दिला होता, त्याची झलक ती नेहमी सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना दाखवत असते. अशातच दियाने पुन्हा एकदा चाहत्यांसोबत तिचा आनंद शेअर केला आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा मुलगा तिला ‘मम्मा’ म्हणजेच ‘आई’ म्हणताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)

व्हिडिओत अव्यान, दियाकडे पाहतो आणि ‘मम्मा’ म्हणून तिला बोलावतो. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा अव्यान याने दियाला ‘मम्मा’ म्हणून पुकारले आहे. अशात दियाचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यानंतर दिया अव्यानला ‘पापा’ म्हणायला सांगताना दिसते, पण अव्यान कोणतीही प्रतिक्रिया देत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza Rekhi (@diamirzaofficial)

दियाच्या या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच, चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. अभिनेत्री मलायका अरोरा हिने नजर न लागण्यासाठी वापरण्यात येणारा इमोजी कमेंट केला आहे. तसेच, अभिनेत्री संजना सांघी हिने “आपला चिमुकला ते बोललाच,” असे म्हटले आहे.

अव्यान यावर्षी १ मे रोजी एक वर्षांचा झाला आहे. मुलाच्या वाढदिवशी दियाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने मुलाच्या आजारपणाबद्दल आणि एक समजूतदार मुलगा होण्याचे दु:ख शेअर केले होते. दियाने या पोस्टमध्ये सांगितले होते की, कशाप्रकारे अव्यानला एका सर्जरीचा सामना करावा लागला होता. जन्मानंतर अव्यानला नेक्रोटायझिंग एंटरोकोलाइसिट असल्याचे समजले होते, त्यानंतर त्याची सर्जरी करण्यात आली होती.

त्यावेळी अव्यान जवळपास ३ महिने एनआयसीयूमध्ये होता. दियाने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक वैभव रेखी याच्यासोबत लग्न केले होते. तिने अचानक लग्नाची घोषणा केली होती. त्यानंतर तिने लगेच तिच्या प्रेग्नंसीचीही घोषणा करत  चाहत्यांना धक्काच दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
प्रियांकाचा आतापर्यंतचा सगळ्यात बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल, बाथरूममध्ये करत होती ‘हे’ काम
देशाचा अभिमान आहे रणवीर सिंगची मेहुणी, भल्याभल्या अभिनेत्रींनाही पछाडण्याचा राखते दम
आवरा रे! फक्त ३ नाड्यांनी बांधलेल्या ड्रेसमध्ये नोराने दिल्या एकापेक्षा एक पोझ, व्हिडिओ भन्नाट व्हायरल