पंजाबी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल हिच्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, ती ‘कभी ईद कभी दिवाली’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शहनाजला ही संधी ‘भाईजान’ने म्हणजेच सलमान खान याने दिली होती. मात्र, आता सलमानने ही संधी तिच्याकडून हिसकावून घेतल्याचं म्हटलं जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते आता वेगळ्याच गोष्टी सांगत आहेत. चाहत्यांना हे जाणून घ्यायचं आहे की, या दोघांमध्ये नेमकं काय झालं आहे. मात्र, शहनाजला चित्रपटातून बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पंजाबी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या वृत्तावर आपले मौन सोडले आहे. शहनाजने आपल्या एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, ती अजूनही या चित्रपटाचा एक भाग आहे आणि सोशल मीडियावर ज्या काही बातम्या व्हायरल होत आहेत, त्या केवळ अफवा आहेत.
शहनाजने सोशल मिडियावर केली पोस्ट
तिच्या पोस्टमध्ये शहनाजने लिहिले की, “LOL! गेल्या काही आठवड्यांपासून अशा अफवा हा माझा रोजचा मनोरंजनाचा डोस बनला आहे. लोक हा चित्रपट पाहतील याची मी वाट पाहू शकत नाही आणि अर्थातच मलाही चित्रपटात पाहा.”
अचानक शहनाजबद्दल बातम्या येऊ लागल्या की, तिचं आणि सलमान खान (Salman Khan) याच्यात भांडण झालं आहे. शहनाजनेही सलमानला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. शहनाज आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून बाहेर असल्याच्या बातम्याही आल्या होत्या, पण नुकतीच अभिनेत्रीने एक पोस्ट टाकून सर्व बातम्यांना पूर्णविराम लावला आहे आणि स्वतः सत्य सांगितले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
चित्रपटाच्या पात्रावर प्रश्नचिन्ह उपास्थित करणाऱ्यांना जान्हवीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…
‘कबीर सिंग’च्या थप्पड सीनवर कियारा अडवाणीचे वक्तव्य; म्हणाली, ‘तुम्ही जेव्हा प्रेमात असता तेव्हा…’
‘इंडियन पोलिस फोर्स’ वेब सीरीजमध्ये दिसणार सिद्धार्थ मल्होत्राचा डॅशिंग लूक, फोटो शेअर करत वाढवली चाहत्यांची उत्सुकता