Thursday, April 18, 2024

चित्रपटाच्या पात्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना जान्हवीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या ‘गुड लक जेरी’ या चित्रपटामुळे फार चर्चेत आहे. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. स्टारकिड असल्यामुळे जान्हवी कपूरचे नाव अनेकदा नेपोटिझमच्या वादात ओढले जाते. आता जान्हवी कपूरने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखती दरम्यान, जान्हवीने तिला स्वतःला मिळणाऱ्या विशेषाधिकारांबद्दल सांगितले आहे.

अलीकडेच, एका माध्यमांशी संवाद साधताना जान्हवी कपूर म्हणाली की, “विशेषाधिकार आणि नेपोटिझम या संपूर्ण वादामुळे लोक मला खरोखर स्वीकारतील की नाही याबद्दल मी शांत राहिली. पण, लोक किती चांगले असतात याचे मला आश्चर्य वाटते. खरे सांगायचे तर, लोकांनी मला स्वीकारावे यासाठी मी किती हताश होतो हे मलाच कळले नाही. ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाच्या बाबतीत हे बऱ्याच अंशी घडलं. पण, अजून बराच पल्ला गाठायचा आहे”.

सिद्धार्थ सेन गुप्ता दिग्दर्शित ‘गुड लक जेरी’ मध्ये जान्हवीने पंजाबमधील एका बिहारी स्थलांतरित झालेल्या मुलींची भूमिका केली आहे जी तिच्या आईच्या कॅंसरच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्यासाठी ड्रग्जचा व्यवसाय करते. जान्हवीने या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. जान्हवीसह दीपक डोबरियाल, सुशांत सिंह, नीरज सूद, सौरभ सचदेवा, जसवंत सिंह दलाल या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाची निर्मिती आनंद एल रायच्या येलो प्रोडक्शन, लायका प्रोडक्शन आणि महावीर जैन यांनी केली आहे. याबद्दल तिचे खूप कौतुक होत आहे. पण, त्याचवेळी काही लोक म्हणतात की इंडस्ट्रीतील विशेषाधिकार प्राप्त करणारी अभिनेत्री मोठ्या पडद्यावर मध्यमवर्गीय मुलीची भूमिका साकारत आहे. या प्रकरणावर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्याला जान्हवीने उत्तर दिले आहे.

जान्हवी म्हणते की, “हो, मला विशेषाधिकार मिळाला आहे. पण जर मला ऑडिशनसाठी रांगेत थांबावे लागले नसेल तर याचा अर्थ असा नाही की मला माझ्या मार्गात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही”. माझ्या अडचणी अतुलनीय आहेत, परंतु अडचणी आल्या आहेत.” जान्हवी पुढे म्हणाली की, “मी कोणाची सहानुभूती मागत नाही. मी काम करत असताना लोकांना मोकळ्या मनाने पाहण्यास सांगत आहे आणि लोकांचे मनोरंजन करण्याचा मी प्रयत्न करत आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

असे काय झाले की, तापसी पन्नूला थेट मीडियासमोर जोडावे लागले हात; व्हिडिओ व्हायरल

छोट्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी केला दिशा पटानीचा बाजार; म्हणाले, ‘आली बघा दुसरी उर्फी जावेद’

‘त्यांनी माझं मुस्काड फोडलं…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने उघडे पाडले महेश भट्ट यांचे पितळ

हे देखील वाचा