Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

इकडं आख्खा देश साजरा करत होता रक्षाबंधन, तिकडं ऋतिकची एक्स पत्नी बॉयफ्रेंडसोबत करत राहिली पार्टी

सुपरस्टार ऋतिक रोशन याची एक्स पत्नी सुझेन खान ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते. यावेळी ती चर्चेत तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक अर्जुन कानुंगो हा नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. लग्नानंतर या अर्जुनने एक शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्येच सुझेन आणि अर्सलान यांनीही हजेरी लावली होती. गुरुवारी (दि. ११ ऑगस्ट) भारतात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. सर्व कलाकार हा सण साजरा करण्यात व्यस्त होते. मात्र, सुझेन ही बॉयफ्रेंडसोबत छोट्या ड्रेसमध्ये पार्टीची मजा घेताना दिसली.

अर्जुन कानुंगो (Arjun Kanungo) याच्या लग्नाच्या पार्टीत सुझेन खान (Sussanne Khan) ही मर्यादेपेक्षा जास्तच बोल्ड अंदाजात सामील झाली होती. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये सुझेन यादरम्यान खूपच शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. यासोबतच ती तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी (Arslan Goni) याच्या खांद्यावर हात ठेवत एकापेक्षा एक शानदार फोटो काढले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

खरं तर, ऋतिक रोशन आणि सुझेन यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांचा घटस्फोट हा जगातल्या महागड्या घटस्फोटांपैकी एक होता. ऋतिकने तब्बल ३०० कोटींहून अधिक रुपये सुझेनला पोटगी म्हणून दिले होते. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. या सर्वांमध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे की, ऋतिकची एक्स पत्नी सुझेन ही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Sussanne-Khan

सुझेन आणि अर्सलान (Sussanne And Arslan) हे अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. दोघांनीही त्यांचे नाते अधिकृत केले आहे. ते दोघे नेहमी एकत्र स्पॉट होताना दिसतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुझेन आणि अर्सलान हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. असे म्हटले जात आहे की, हे लग्न खूप कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

माध्यमांतील वृत्तांनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुझेन आणि अर्सलान हे समजूतदार असून काय करायचे हे त्यांना माहिती आहे. त्यांना त्यांचे पुढील आयुष्य एकत्र घालवायचे आहे. याबाबत ते विचार करत आहेत. सुझेनने अर्सलानशी लग्न करण्याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. जर तिला लग्न करायचे असेल, तर ते सामान्य पद्धतीनेच केले जाईल, कोणतेही ग्रँड सेलिब्रेशन नसणार आहे.

अशात हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे’, ट्रोलिंंगनंतर गायक राहुल देशपांडेंनी टिकाकारांना दिले चोख उत्तर
अजय आणि युग या बाप-लेकामधील झक्कास नातं व्हिडिओतून आलं समोर, चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव
रिलीझपूर्वीच विजय-अनन्याच्या सिनेमाने केली छप्परफाड कमाई; जगभरात ‘एवढ्या’ कोटीत विकले गेले थिएटर राईट्स

हे देखील वाचा