Saturday, April 20, 2024

रिलीझपूर्वीच विजय-अनन्याच्या सिनेमाने केली छप्परफाड कमाई; जगभरात ‘एवढ्या’ कोटीत विकले गेले थिएटर राईट्स

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा याचा ‘लायगर‘ हा सिनेमा येऊ घातलाय. या सिनेमातून विजय बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या सिनेमात विजयसोबत अभिनेत्री अनन्या पांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा या दोघांचा पहिला पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमासोबतच दोघेही कलाकार चर्चेचे धनी ठरत आहेत. विजय बॉलिवूड पदार्पण करत आहे, तर दुसरीकडे अनन्या साऊथमध्ये तिच्या कारकीर्दीची सुरुवात करत आहे. विजय आणि अनन्याच्या अदाकारीचा तडका असणारा हा सिनेमा २ आठवड्यातच जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा विजयचा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये संपूर्ण टीम व्यस्त आहे. आता या सिनेमाबाबत अजून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) अभिनित ‘लायगर’ (Liger) या सिनेमासाठी दिग्दर्शक पुरी जगन्नाथ खूपच उत्साही आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, सिनेमाने निर्मात्यांना प्रदर्शनापूर्वीच छप्परफाड कमाई करून देण्यास सुरुवात केली आहे. खरं तर, हाती आलेल्या काही वृत्तांनुसार, जगभरात ‘लायगर’ या सिनेमाचे ओव्हरसीज थिएटर हक्क सारेगामा सिनेमाने ८ कोटी रुपयांच्या मोठी रक्कमेत खरेदी केले आहेत. हे हक्क विजय आणि पुरी जगन्नाथ दोघांच्या कारकीर्दीतील आतापर्यंत विकले गेलेले सर्वाधिक महागडे हक्क आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

या बहुचर्चित सिनेमाच्या कमाईच्या अंदाजाबद्दल बोलायचं झालं, तर विश्लेषकांनुसार, हा सिनेमा जगभरात ८२ कोटी रुपयांची कमाई करू शकतो. ८२ कोटी रुपयांपैकी हिंदी व्हर्जनमधून ‘लायगर’ हा सिनेमा १० कोटी रुपये कमावून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सिनेमाचे निर्माते हिंदीच्या प्रमोशनवरही खूप लक्ष देत आहेत. तसेच, हिंदी प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबतची क्रेझ पाहायला मिळत आहे. सर्वांना विजय आणि अनन्याला एकत्र काम करताना पाहण्यासाठी खूपच उत्साहित आहेत.

पुरी जगन्नाथ यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘लायगर’मध्ये विजय आणि अनन्या यांच्याव्यतिरिक्त राम्या कृष्णनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच सिनेमात माईक टायसन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाची खासियत अशी की, हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू दोन्हीत एकत्र शूट करण्यात आला आहे. विजयच्या मागील काही सिनेमांची कमाई पाहिली, तर हा सिनेमाही चांगली कमाई करणार असल्याचे दिसत आहे. मात्र, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, हा सिनेमा प्रदर्शनानंतर किती रुपये कमावतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
बापाच्या पैशांवर जगणाऱ्या मुलींमधली नाही सारा; वर्षाकाठी छापते ‘एवढे’ कोटी, एका सिनेमासाठी घेते ३ कोटी
मोठी बातमी! प्रसिद्ध कन्नड गायकाचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
आणखी एका निर्णयाने अल्लू अर्जुनने जिंकली करोडो चाहत्यांची मने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

हे देखील वाचा