हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याला ‘फॅमिली मॅन’ म्हणून ओळखले जाते. अजय नेहमी त्याच्या कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरात आहे. तो त्याच्या सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. अजयला इंस्टाग्रामवर ८० लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. कदाचित त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. अशात त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो त्याचा मुलगा युग देवगण याच्यासोबत दिसत आहे. तो त्याच्या मुलाला हात मिळवण्याची अनोखी स्टाईल शिकवत आहे. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) याने जो व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओत तो त्याच्या मुलाची गळाभेट घेताना दिसत आहे. त्याने मुलगा युग देवगण (Yug Devgan) याच्या माथ्यावर किस केले आणि अनोख्या हात मिळवण्याच्या स्टाईलचा सराव करून घेतला. अजयने पुन्हा त्याच्या मुलाचा हात हातात घेतल्यानंतर त्याची गळाभेट घेतली. व्हिडिओ शेअर करत अजयने लिहिले की, “बाप-लेकाच्या खास हँडशेकवर काम करत आहे.”
View this post on Instagram
अजय आणि युगच्या आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या लोकांनी या बाप-लेकाच्या सुंदर क्षणांचा आनंद घेतला. अजयच्या चाहत्यांना हा व्हिडिओ भलताच आवडला असून ते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने या बाँडिंगला ‘गोड’ म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या एका युजरने याला ‘अद्भूत’ म्हटले आहे. अनेक युजर्सने या व्हिडिओवर बदामाचे इमोजी पोस्ट केले आहेत. तसेच, या बाप-लेकाची प्रशंसाही केली.
अजयने यापूर्वीही शेअर केला होता व्हिडिओ
अजयने त्याच्या मुलाबद्दल अशी पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. अजयने १ जुलै रोजी युगचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, “वन रिमाईंडर फ्रॉम द लिटिल वन.” या व्हिडिओत युग एकापाठोपाठ एक असे दोन ग्लास पाणी पिऊन लोकांना हायड्रेटेड राहण्याची आठवण करून देताना दिसला होता.
या सिनेमात झळकणार अजय देवगण
अजयच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर अजय आगामी ‘थँक गॉड’ या सिनेमात झलकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत रकुल प्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तो सध्या त्याची सहअभिनेत्री तब्बूसोबत ‘भोला’ सिनेमाची शूटिंग करत आहे. त्याच्या आगामी सिनेमात ‘दृश्यम २’, ‘सर्कस’, ‘मैदान’ आणि ‘नाम’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रिलीझपूर्वीच विजय-अनन्याच्या सिनेमाने केली छप्परफाड कमाई; जगभरात ‘एवढ्या’ कोटीत विकले गेले थिएटर राईट्स
बापाच्या पैशांवर जगणाऱ्या मुलींमधली नाही सारा; वर्षाकाठी छापते ‘एवढे’ कोटी, एका सिनेमासाठी घेते ३ कोटी
मोठी बातमी! प्रसिद्ध कन्नड गायकाचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव