Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड चौफेर आगीचे लोट अनं रक्ताने माखलेला शाहरुख खान, ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातील व्हायरल व्हिडिओने चाहत्यांना लावले वेड

चौफेर आगीचे लोट अनं रक्ताने माखलेला शाहरुख खान, ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटातील व्हायरल व्हिडिओने चाहत्यांना लावले वेड

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट ब्रह्मास्त्रमध्ये कॅमिओ करणार आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी शाहरुख खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचवेळी ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख खानच्या लूकबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. त्यामुळे अखेर पडदा उचलण्यात आला आहे. या चित्रपटातील किंग खानचा लूक लीक झाला आहे. ज्यामध्ये शाहरुख खान खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. हे पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टही लोकप्रिय जोडी काम करताना दिसणार आहे. लग्नानंतर त्यांचा हा पहिलाच चित्रपट असल्याने सध्या त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर ब्रह्मास्त्र चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की या चित्रपटात शाहरुख खानचा लूक आहे. मात्र, शाहरुख खानच्या लूकबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये शाहरुख रक्ताने माखलेला दिसत आहे. या संपूर्ण लूकमध्ये किंग खानचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्रमध्ये शाहरुख खान वनराष्ट्राच्या भूमिकेत आहे. याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्यासह इतर कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

नुकताच ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ज्याला चित्रपटाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना चांगलीच पसंती मिळाली होती. ब्रह्मास्त्र हा चित्रपट पुढील महिन्यात ९ सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

हेही वाचा –एवढ्या कोटीत तर गरिबाच्या ५ पिढ्या बसून खातील, किती आहे विजयच्या आलिशान बंगल्याची रक्कम?
अडीच हजार मुलांची हार्ट सर्जरी करत केला विश्वविक्रम, गायिका पलकने सांगितला तिचा संघर्षमय प्रवास ‘भन्साळींसोबत काम करणे माझ्यासाठी लाजीरवाणे’, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

 

हे देखील वाचा