‘भन्साळींसोबत काम करणे माझ्यासाठी लाजीरवाणे’, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

‘पंड्या स्टोर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शायनी दोशी ही टेलिव्हिजन दुनियेतली नामवंत कलाकार म्हणून ओळखली जाते. या मालिकेमुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. शायनीने खूप कमी वेळात छोट्या पडद्यावर मोठी कामगिरी बजावली आहे. शायनीने प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘सरस्वतीचंद्र’ टीव्ही शोमधून पदार्पण केले होते. तसं तर, भन्साळींसोबत काम करण्यासाठी खूप स्टार्स धडपडतात, पण जेव्हा शायनीला ही संधी मिळाली, तेव्हा तिच्यासाठी हे फारच कठीण होते.

शायनी दोशी (Shiny Doshi) ही बातमी ऐकल्यापासून ती स्वत:ला खूपच लकी मानत होती की, तिला संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, टीव्ही अभिनेत्रीने दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना म्हटले की, “मी खूप वेळा शो मध्येच सोडण्याचा प्रयत्न केला होता. कारण, मला अभिनय जमत नसल्यामुळे खूप एकावे लागत होते.”

शायनीला रोज लाजीरवाणे वाटायचे
शायनी दोशीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, मी २०१२ मध्ये ‘सरस्वतीचंद्र’ (Saraswatichandra) या मालिकेत काम केले होते, तेव्हा मला काहीच काम जमत नव्हते. मी माझ्या दिग्दर्शकाचे खूप बोलणे खात होते. ते मला खूप ओरडायचे, त्यामुळे मला खूप लाजीरवाणे वाटत होते. कधीकधी असे वाटायचे की, चुकीच्या जागी तर नाही ना आले, मी सगळ्यांचे बोलणे ऐकून घ्यायचे आणि बाथरुममध्ये जाऊन रडत बसायचे. मी स्वत:ला मजबूत बनवून परत सेटवर यायचे.

मालिका सोडणार होती शायनी दोशी
शायनी दोशी पुढे बोलली, “प्रत्येक सीन करताना मला भीती वाटत होती. कारण, मला तांत्रिक गोष्टींचे ज्ञान नव्हते. हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता. भन्साळी माझ्या लूक टेस्टसाठी तिथेच बसले होते, त्यामुळे आणखीच दडपण आले होते. मात्र, ती फटकारच आपल्याला परिपूर्ण बनवत असते. मी सेटवर एवढा ओरडा खात होते की, १००० वेळा माझे मन मला बोलत होते की, ‘तू हे काम सोड.’ माझा प्रत्येक दिवस असाच जायचा. या दिवसांमध्ये उत्साह आणि आनंदाची कमतरता असायची. असे वाटत होते की, आज पुन्हा सकाळी उठून बोलने खायला जायचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by shiny doshi (@shinydoshi15)

शायनी दोशीने प्रोडक्शन टीमला दिला होता नकार
शायनी दोशी ही ‘सरस्वतीचंद्र’ या मालिकेत कुसुम या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत तिच्यासोबत गौतम रोढे आणि जेनिफर विंगेट हे कलाकार देखिल मुख्य भूमिकेत होते. शायनी दररोज ओरडा ऐकून थकली होती. तिला खूपच नकारात्मक वाटत होते. त्यामुळे तिने तर प्रोडक्शन हाउसला कॉल करून सांगितले की, ‘मी या भूमिकेसाठी योग्य नाही.’ मला वाटत होते की, माझ्याकडून हे काम होऊ शकनार नाही, पण नंतर कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला.”

आता शायनी दोशी ‘पंड्या स्टोर’ या मालिकेत ‘धरा’ या नावाच्या मुख्य भूमिकेत काम करत आहे, ही मालिका मराठीतील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेची हिंदी रिमेक आहे. ही मालिका एकत्र कुटुंबावर बनवलेली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
‘बदनाम व्हायला मी मुन्नी आहे का?’ उर्वशी रौतेला रिषभ पंतचा सोशल मीडियावर रंगला वाद
इकडं आख्खा देश साजरा करत होता रक्षाबंधन, तिकडं ऋतिकची एक्स पत्नी बॉयफ्रेंडसोबत करत राहिली पार्टी
‘भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे’, ट्रोलिंंगनंतर गायक राहुल देशपांडेंनी टिकाकारांना दिले चोख उत्तर