Monday, January 19, 2026
Home टेलिव्हिजन अकरा वर्षांच्या मुलाने नेहालाही दिली टक्कर, तिच्याच गाण्यावर परफॉर्म करत गायिकेला रडायलाच पाडले भाग

अकरा वर्षांच्या मुलाने नेहालाही दिली टक्कर, तिच्याच गाण्यावर परफॉर्म करत गायिकेला रडायलाच पाडले भाग

लहानपणी वडिलांसोबत भजन- कीर्तन गाणारी नेहा कक्कर आज बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका बनली आहे. तिने खूप खडतर प्रवास करत हे स्थान मिळवले आहे. तिने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तिचा आवाज ऐकण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नेहा बरेच दिवस झाले छोट्या पडद्यावर दिसली नाहीये. तिला टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही उत्सुकताही ती लवकरच दूर करणार आहे. कारण, नेहा सिंगिंग रियॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर २’ या शोच्या आगामी एपिसोडमध्ये पाहुणी म्हणून येणार आहे.

स्पर्धकाला गाताना पाहून नेहा झाली बनली चाहती
‘सुपरस्टार सिंगर २’ शोचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये नेहा कक्कर (Neha Kakkar) हिला चाहते भावूक करताना दिसत आहेत. ११ वर्षांची स्पर्धक मणि (Mani) हिने नेहासमोर तिचे सुपरहिट गाणे ‘माही वे’ हे गायले. हे गाणे नेहाला इतके आवडले की, ती तिचे अश्रू थांबवू शकली नाही आणि ती ढसाढसा रडू लागली. नेहा ११ वर्षाच्या स्पर्धकाच्या गायकीने खूपच इम्प्रेस झाली.

नेहाने मणिचा परफॉर्मन्स संपल्यानंतर तिची जोरदार प्रशंसा केली. नेहाने भावूक होत म्हटले की, “हे गाणे मी हजारो कॉन्सर्टमध्ये सादर केले आहे. आज तू जसे गायले, तसे मी कधीच गाऊ शकत नाही.” नेहाने स्पर्धक मणिची गळाभेट घेतली. मणिच्या आवाजाने नेहाच नाही, तर परीक्षक हिमेश रेशमिया यालाही इम्प्रेस केले. जेव्हा मणि स्टेजवर गात होता, तेव्हा नेहा त्याच्यासाठी हूटिंग करत होती. स्पर्धक मणिच्या आवाजाने नेहाचे मन जिंकले.

रियॅलिटी शोमधून स्टार बनली नेहा
नेहाबद्दल बोलायचं झालं, तर तिचे ‘माही वे’ हे गाणे खूपच हिट झाले होते. नेहा आज खूप मोठी गायिका बनली आहे. मात्र, तिने तिच्या कारकीर्दीची सुरुवात सिंगिंग रियॅलिटी शोमधूनच केली होती. नेहा आधी जागरणामध्ये गात असायची. ती इंडियन आयडलच्या दुसऱ्या भागात दिसली होती. नेहा हा शो जिंकू शकली नव्हती, पण तिने तिच्या आवाजाने सर्वांची मने जिंकली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बिपाशाचे मूल असावे ‘या’ व्यक्तीची होती इच्छा, प्रेग्नंसीबद्दल समजताच धावत सुटली होती अभिनेत्री
अमिताभ बच्चन आणि नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे रंगल्या चर्चा, ‘या’ गोष्टीसाठी मिळवला हात
‘तारक मेहता…’मधील ‘या’ अभिनेत्रीला पहिल्या भेटीतच बॉयफ्रेंडने केलेली घाणेरडी मागणी, तिनेही…

हे देखील वाचा