Thursday, March 30, 2023

विमानतळावर नेहा कक्करला पाहून चाहतीला कोसळले रडू; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हरऍक्टिंगचे ५० रुपये कट’

सामान्य कुटुंबातून येऊन बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिकांच्या पंक्तीत स्थान मिळवणे सोपी गोष्ट नाहीये. मात्र, ही कामगिरी प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने करून दाखवली. लहानपणी वडिलांसोबत भजन गाणारी नेहा कक्कर हिला आज जगभरात ओळखले जाते. नेहाने तिच्या आवाजाने प्रत्येकाला आपला चाहता बनवले आहे. त्यामुळेच ती जिथेही जाते, तिथे चाहते तिला भेटण्यासाठी तरसताना दिसतात. तीदेखील तिच्या चाहत्यांना निराश करत नाही. असेच काहीसे पुन्हा पाहायला मिळाले. जेव्हा विमानतळावर नेहाला पाहून तिची चाहती थेट भावूक झाली आणि रडू लागली. तसेच, तिने तिची भेटही घेतली. यावेळी नेहा तिला शांत करताना दिसली. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिच्या चाहतीला विमानतळावर भेटताना दिसत आहे. तिला पाहून तिची महिला चाहती थेट रडू लागते. नेहाची हात मिळवणी करताना तिचे हातही थरथर कापू लागतात. अशात नेहा तिला दिलासा देते आणि शांत करून मिठी मारते. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. कतसेच, नेहाचे चाहतीला भेटणे, तिला सहानुभूती देणे तिच्या चाहत्यांना आवडत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी नेहाच्या कृतीसाठी तिचे कौतुकही केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

या व्हिडिओला आतापर्यंत २० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सही मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर चांगल्या- वाईट कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडिओवर लव्ह इमोजीचाही वर्षाव होत आहे. दुसरीकडे, एकाने कमेंट करत लिहिले की, “हिचे चाहतेही हिच्यासारखेच रडके आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “चाहते, सेलिब्रिटीला भेटून रडू कसे शकतात?” आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, “ती काय देवीदेवता आहे का, तिचे हात थरथर कापत आहेत.” आणखी एकाने लिहिले की, “ओव्हरऍक्टिंगचे ५० रुपये कट.”

नेहा ही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर ७ कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात. तिच्या गाण्यांनाही चाहत्यांची तुफान पसंती मिळते. याव्यतिरिक्त नेहा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यालाच आवडत नाहीये त्याचा अभिनय, स्वत:च सांगितले धक्कादायक कारण
भावूक क्षण! अभिनेत्री हिना खानने दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा, वाढदिवशी केक घेऊन पोहोचली कबरीवर
‘अरे यार, जेव्हापासून मी इंडस्ट्रीत आले…’, विजयसोबतच्या रिलेशनशिपबद्दल रश्मिकाने सांगूनच टाकलं

हे देखील वाचा