कुठलाही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये तग धरणे तसे कठीणच. मात्र, स्वत:च्या जोरावर बॉलिवूड गाजवणे फार कमी कलाकारांना जमते. त्या अभिनेत्यांमध्ये कार्तिक आर्यन याचा समावेश होतो. कार्तिकने खूप मोठ्या संघर्षातून हा पल्ला गाठला आहे. यावर्षातील दुसरा सर्वात हिट हिंदी सिनेमा ‘भूल भुलैय्या २’ देणाऱ्या कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो एका छोट्या चाहत्यासोबत रस्त्याच्या मध्ये संवाद साधताना दिसत आहे.
सोशल मीडियावर वाहवा लुटतोय कार्तिकचा व्हिडिओ
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. एवढा मोठा सुपरस्टार असूनही तो नेहमीच सामान्य लोकांच्या गाठीभेटी घेताना दिसतो. नुकतेच कार्तिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कार्तिक एका छोट्या चाहत्याशी बोलताना दिसत आहे. गाडी थांबवून आपल्या चाहत्याशी चर्चा करणाऱ्या कार्तिकचा हा अंदाज प्रत्येकाला आवडला आहे.
View this post on Instagram
व्हिडिओत दिसते की, छोटा चाहता कार्तिकच्या ‘भूल भुलैय्या २’ सिनेमाचे कौतुक करताना दिसत आहे. यासोबतच कार्तिक त्याला धन्यवाद देतानाही दिसत आहे. यानंतर कार्तिक त्या मुलासोबत फोटोही काढतो. सोशल मीडियावर या व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहते कार्तिकच्या या व्हिडिओची जोरदार प्रशंसा करत आहेत.
या सिनेमात झळकणार कार्तिक
कार्तिक आर्यन याने सन २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार का पंचनामा’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यानंतर तो ‘लुका छुपी’, ‘धमाका’, ‘पती पत्नी और वो’ यांसारख्या सिनेमात दिसला. आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्याची यादी खूप मोठी आहे. ‘भूल भुलैय्या २’च्या अफाट यशानंतर कार्तिक आगामी ‘शहजादा’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे. यानंतर कार्तिक प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांच्या ‘कॅप्टन इंडिया’ या सिनेमात दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाने थिएटरमध्ये पूर्ण केले १०० दिवस, बजेटच्या तिप्पट छापला पैसा
लैंगिक अत्या’चार करणाऱ्यांच्या गळ्यात हार आणि तोंडात पेढे, जावेद अख्तरांनी ट्विटरवरच केली आगपाखड
मित्र जगावा म्हणून हनुमान चालीसाचे पठण करतोय एहसान कुरेशी; म्हणाला, ‘डॉक्टरांनी मानलीये हार’