Sunday, April 14, 2024

लैंगिक अत्या’चार करणाऱ्यांच्या गळ्यात हार आणि तोंडात पेढे, जावेद अख्तरांनी ट्विटरवरच केली आगपाखड

बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार आहेत, जे देशातील मुद्द्यावर बेधडक वक्तव्य करत असतात. त्यापैकीच एक म्हणजे प्रसिद्ध गीतकार, कवी जावेद अख्तर होय. गुजरातमधील सर्वाधिक चर्चित बिल्किस बानो प्रकरण पुन्हा एकदा माध्यमांमध्ये झळकत आहे. खरं तर, अलीकडेच या सामूहिक लैंगिक अत्या’चार प्रकरणातील ११ दोषी तुरुंगातून सुटले आहेत, ज्यावर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अख्तर हेदेखील या मुद्द्यावर व्यक्त झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी कडक विरोध जाहीर करत ट्विटरवर मत मांडले आहे.

जावेद अख्तर यांनी व्यक्त केली नाराजी
जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बिल्किस बानो प्रकरणी (Javed Akhtar On Bilkis Bano Case) ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले की, “ज्या लोकांनी पाच महिन्यांच्या प्रेग्नंट महिलेवर लैंगिक अत्या’चार केले आणि तिच्या ३ वर्षीय मुलीसह कुटुंबातील ७ लोकांची हत्या केली, त्यांना तुरुंगातून सोडून देण्यात आले. या लोकांच्या गळ्यात फुलांची माळ घालण्यात आली आणि मिठाईदेखील चारण्यात आली.” पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, यावर विचार करण्याची गरज आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “कोणत्याही गोष्टीमागे लपू नका. आपल्या समाजात काहीतरी चुकीचे होत आहे, जे खूपच गंभीर आहे.”

सन २००८मध्ये मिळाली होती शिक्षा
खरं तर, सन २००२मध्ये झालेल्या गुजरात दंगलीवेळी बिल्किस बानो हिच्यावर ११ लोकांनी लैंगिक अत्या’चार केले होते. न्यायालयात हे प्रकरण दीर्घ काळ चालले. सन २००८ मध्ये या प्रकरणी सुनावणी करत न्यायालयाने ११ लोकांना आरोपी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मात्र, १४ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर या सर्व आरोपींना गुजरात सरकारने १५ ऑगस्ट रोजी माफ करत सोडून दिले. राज्य सरकारच्या या निर्णयावर हजारो लोकांना सर्वोच्च न्यायालयाकडे वेळेच्या आधीच आरोपींना मुक्तता रद्द करण्याचे आवाहन केले आहे. अनेकांनी हा अन्याय असल्याचेही म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
मित्र जगावा म्हणून हनुमान चालीसाचे पठण करतोय एहसान कुरेशी; म्हणाला, ‘डॉक्टरांनी मानलीये हार’
पवन सिंग अन् आम्रपाली दुबेचे सर्वात बोल्ड गाणे व्हायरल, एक-दोन नाही, तर मिळालेत ‘एवढे’ कोटी हिट्स
आनंदाची बातमी! ‘साथ निभाना साथिया’मधील ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा आई बनणार, हटके अंदाजात केली घोषणा

हे देखील वाचा