Friday, March 29, 2024

महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाने थिएटरमध्ये पूर्ण केले १०० दिवस, बजेटच्या तिप्पट छापला पैसा

अभिनेता महेश बाबू हा साऊथच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणला जातो. त्याचे अनेक सिनेमे बक्कळ कमाई केल्याशिवाय राहत नाही. तसेच, त्याचे सिनेमे अनेक विक्रमही करतात. अशात त्याने पुन्हा एकदा कीर्तिमान स्थापित केला आहे. त्याच्या ‘सरकारू वारी पाटा’ या नवीन सिनेमाने चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले आहेत. ही त्याच्यासाठी खूप मोठी बाब आहे. कारण, हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला बॉलिवूडबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार ट्रोल करण्यात आले होते.

महेश बाबू (Mahesh Babu) याच्या ‘सरकारू वारी पाटा’ (Sarkaru Vaari Paata) या सिनेमाला सुरुवातीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यामधून स्पष्ट होते की, बॉलिवूडबद्दल केलेल्या वक्तव्याचा त्याच्या सिनेमावर फार काही परिणाम झाला नाहीये. तसेच, तो त्याच्या या सिनेमाच्या यशाचा आनंद लुटत आहे.

‘सरकारू वारी पाटा’ सिनेमाचे चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण
चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण करणाऱ्या ‘सरकारू वारी पाटा’ २०२२मध्ये तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून पुढे आला आहे. सिनेमाने राज्याच्या गोपालपट्टणममध्ये मौर्य चित्रपटगृह आणि चिलकालुरिपेटमध्ये कृष्णा महल डीलक्स चित्रपटगृहात १०० दिवस पूर्ण केले आहेत. सुपरस्टार महेश बाबूचा १०० दिवस चालणारा हा सलग १८वा सिनेमा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जवळपास १८० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

धमाल करत आहे ‘सरकारू वारी पाटा’मधील ‘कलावती’ गाणे
मैत्री मूव्ही मेकर्स, १४ रील्स प्लस एंटरटेनमेंट आणि जीएमबी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या ‘सरकारू वारी पाटा’ या सिनेमात महेश बाबूसोबत कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन परशुराम पेटला (Parasuram Petla) यांनी केले आहे. तसेच, एस थमन यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. या सिनेमातील ‘कलावती’ हे गाणे तुफान गाजत आहे. सिनेमात महेश बाबू आणि कीर्ती सुरेशव्यतिरिक्त सौम्या मेनन, सुब्बाराजू आणि समुथिरकानी यांच्याही भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
लैंगिक अत्या’चार करणाऱ्यांच्या गळ्यात हार आणि तोंडात पेढे, जावेद अख्तरांनी ट्विटरवरच केली आगपाखड
मित्र जगावा म्हणून हनुमान चालीसाचे पठण करतोय एहसान कुरेशी; म्हणाला, ‘डॉक्टरांनी मानलीये हार’
पवन सिंग अन् आम्रपाली दुबेचे सर्वात बोल्ड गाणे व्हायरल, एक-दोन नाही, तर मिळालेत ‘एवढे’ कोटी हिट्स

हे देखील वाचा