Friday, January 16, 2026
Home बॉलीवूड ‘राजपुत आहे झुकणार नाही’, म्हणताच भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘आम्ही सगळे काय मोदींचे…’

‘राजपुत आहे झुकणार नाही’, म्हणताच भडकले विवेक अग्निहोत्री; म्हणाले, ‘आम्ही सगळे काय मोदींचे…’

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सीबीआयच्या निशाण्यावर आहेत. दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून यापूर्वी मनीष सिसोदिया यांच्यावर छापे टाकण्यात आले आहेत. या सगळ्यामध्ये मनीष सिसोदिया यांनी एक वक्तव्य केले असून, त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत आपण राजपूत आहोत आणि झुकणार नाही असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

वास्तविक मनीष सिसोदिया यांनी सोमवारी सकाळी ट्विट करून दावा केला आहे की, त्यांना भाजपकडून मेसेज आला आहे. त्यांनी आम आदमी पार्टी सोडुन आपली बाजू बदलल्यास त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला खटला मागे घेतला जाईल, असे संदेशात लिहिले होते. उत्तरात मनीष सिसोदिया यांनी “मी राजपूत आहे, महाराणा प्रतापचा वंशज आहे. मी माझे डोके कापून टाकीन, परंतु भ्रष्ट आणि कारस्थान करणाऱ्यांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत, तुम्हाला जे करायचे ते करा.” त्यांच्या याच वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रीने संताप व्यक्त केला आहे.

मनीष सिसोदिया यांच्या या ट्विटवर विवेक अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त करत हा कसला जातिवाद आहे असा सवाल केला. या ट्विटला रिट्विट करत विवेक अग्निहोत्री यांनी “हा कसला जातीवादी वाद आहे? म्हणजे राजपूत नसते तर मनीष सिसोदिया झुकले असते, शरण गेले असते. म्हणजे दिल्लीत राहणारे ब्राह्मण, यादव, गुज्जर, जाट, शीख वगैरे सगळे नतमस्तक होतात का? मुस्लिम, ख्रिश्चन, दलित….हे सगळे झुकणारे समुदाय आहेत का?” असा सवाल मनिष सिसोदिया यांना केला आहे.

दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या द काश्मिर फाईल्स चित्रपटापासुन चांगलेच चर्चेत आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. हा चित्रपट काश्मिर खोऱ्यात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित होता.

हेही वाचा –
ये भारत का तिरंगा है, झुकेगा नहीं! अल्लू अर्जुनची न्यूयॉर्कमध्ये डरकाळी, व्हिडिओ पाहून वाटेल अभिमान
मुलाचा वाढदिवस साजरा करताना भावूक झाली इरफान खानची पत्नी, व्हिडिओ शेअर करत सांगितला ‘हा’ किस्सा
प्रेमाच्या रंगात रंगलेत नयनतारा आणि विघ्नेश, रोमॅंटीक फोटो व्हायरल

हे देखील वाचा