Thursday, March 30, 2023

ये भारत का तिरंगा है, झुकेगा नहीं! अल्लू अर्जुनची न्यूयॉर्कमध्ये डरकाळी, व्हिडिओ पाहून वाटेल अभिमान

 दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) गणना यशस्वी अभिनेत्यांमध्ये आधीच केली जात होती, परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ने जणू काही त्याच्या लोकप्रियतेला एक वेगळीच झळाळी दिली. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनची जबरदस्त फॅन फॉलोइंग आता देशातच नाही तर परदेशातही आहे. याची झलक अलीकडेच दिसली जेव्हा अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा रेड्डीसोबत न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडमध्ये सहभागी झाला होता. जिथे अल्लूला पाहण्यासाठी चाहते जमले होते. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊ. 

सध्या सोशल मीडियावर न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  यातील एक व्हिडिओ असा आहे की, जो पाहून तुमचे मन आनंदित होईल. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन असे काही करताना दिसत आहे जे पाहून तुम्हाला अभिमान वाटेल. व्हिडिओमध्ये दिसत आहे की अल्लू अर्जुन त्याच्या पत्नीसोबत स्टेजवर उभा आहे आणि त्याच्यासोबत आणखी लोक दिसत आहेत. मग अर्जुन भारताचा तिरंगा हातात घेतो आणि ‘पुष्पा’ शैलीत म्हणतो, ‘हा भारताचा तिरंगा आहे, कधीही झुकणार नाही’. अर्जुनचा हा संवाद पुष्पा स्टाईलमध्ये ऐकून लोक टाळ्या वाजवू लागतात आणि शिट्ट्या वाजवू लागतात.

अल्लू आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी या परेडमध्ये सहभागी झाले होते जिथे त्याला ग्रँड मार्शलची पदवी देण्यात आली होती. अल्लूचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो आपल्या पत्नीसोबत जीपमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातात तिरंगा दिसत आहे. अल्लू पांढऱ्या सूटमध्ये डॅशिंग दिसत आहे तर स्नेहा पिवळ्या सूटमध्ये सुंदर दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुष्पा चित्रपटाच्या दमदार यशानंतर या चित्रपटाचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा –
मुलाचा वाढदिवस साजरा करताना भावूक झाली इरफान खानची पत्नी, व्हिडिओ शेअर करत सांगितला ‘हा’ किस्सा
आता लग्न झाल्यानंतरही होऊ शकता मिस युनिवर्स, २०२३ पासून होणार ‘हे’ बदल
मिथुन चक्रवर्तीच्या सुनेने कास्टिंग काऊचबद्दल केला खळबळजनक खुलासा; म्हणाली, ‘मला मीटिंगमध्येच…’

हे देखील वाचा