Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

आपल्या सुंदर अभिनयाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच ‘जेनेलिया देशमुख’ होय. जेनेलिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती आपले नवनवीन आणि भन्नाट व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. मग तो व्हिडिओ स्विमिंग पूलमध्ये मजा- मस्ती करतानाचा असो किंवा मग आपल्या मुलांसोबत डान्स करताना असो. नुकताच म्हणजे कालच (८ मार्च) ‘महिला दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला. यादरम्यान सर्व कलाकारांनी सामाजिक संदेश देणारे फोटो, व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये जेनेलियाचाही समावेश होता. तिने आपला एक व्हिडिओ शेअर करत प्रेरणादायी संदेश दिला.

जेनेलियाने आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवरील पोस्टमधून सांगितले की, तिने कशाप्रकारे इतरांसाठी एक प्रेरणा म्हणून स्केटिंग शिकण्याचे आणि आपल्या मुलांना कंपनी देण्याचे ठरवले. स्केटिंग करताना तिच्या हाताला दुखापतग्रस्त झाली. याचा एक व्हिडिओ तिने शेअर केला. या व्हिडिओत तिने महिला दिनानिमित्त एक प्रेरणादायी संदेश आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला. तिने कधीही हार न मानता प्रयत्न करत राहण्याचे सांगितले. दरम्यान तिला कशाप्रकारे दुखापत झाली, हेदेखील या व्हिडिओत दिसत आहे. तसेच तिने भन्नाट अंदाजात आपल्या रिकव्हरीबद्दलही सांगितले आहे.

हा व्हिडिओ शेअर करत जेनेलियाने लिहिले की, “काही आठवड्यांपूर्वी मी स्केटिंग शिकण्याचे ठरविले कारण मला वाटले की मी माझ्या मुलांसाठी प्रेरणादायक आणि मोठी कंपनी असू शकते. एकदा मला हे समजल्यानंतर मी एक चांगला व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकण्याचा विचार केला. मला वाटले की मी हे कोणत्याही प्रकारे केले पाहिजे, कारण इंस्टाग्राम हे नेहमीच प्रेरणादायी असते. परंतु आपण पडलेल्या काळाविषयी काय? ‘कधी कधी तू उडण्याआधीच पडायचं’ मी आशा करते की, कितीही पडले तरीही मी उठेल. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी प्रयत्न केला आहे आणि मी यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करेन (आशा आहे की यापुढे कधीही पडणार नाही) सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.”

जेनेलियाने सन २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही मुख्य भूमिकेेत होता. यानंतर जेनेलिया आणि रितेशने अनेक चित्रपटात काम केले. पुढे त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्यांनी सन २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे नाव राहिल आणि रियान असे आहे.

हे देखील वाचा