…अन् कॉमेडीअन सुनील ग्रोव्हरच्या घरात झाली दह्याची चोरी, माकडाने असा साधला डाव


मालिकांपासून ते बॉलिवूडपर्यंत सुनील ग्रोव्हर हा आपल्या विनोदी अभिनयासाठी ओळखला जातो. आपल्या ‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमातील गुत्थीच्या पात्रामुळे तो घराघरांत पोहोचला. याशिवाय त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. केवळ मनोरंजनात विश्वात नव्हे तर तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपले फोटो आणि व्हिडिओ शेयर करत तो चाहत्यांच्या नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मग ते पाणीपुरी बनवतानाचा असो वा ज्यूस बनवताना. त्याचे प्रत्येक व्हिडिओ सोशलवर तुफान व्हायरल होत असतात. याच सुनीलच्या घरात चक्क चोरी झाली आहे, ऐकून आश्चर्य वाटेल पण तितकाच विनोदाचाही भाग आहे.

सध्या सुनीलचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने हा व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यात एका माकडाने सुनीलच्या स्वयंपाक घरातून दह्याची चोरी केली आहे.

हा व्हिडिओचे चित्रीकरण स्वतः सुनीलने केले आहे, ज्यात एक माकड सुनीलच्या स्वयंपाक घरात शिरताना दिसतेय. तसेच ते चटकन दह्याचा डब्बा उचलून पसार झाले. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये सुनिलचा हसताना आवाज आला आहेच सोबतच ‘तो दही घेऊन गेला ‘ असे म्हणत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेयर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की “तो दही घेऊन पळाला.”

सुनीलचा हा व्हिडिओ शेयर झाल्यावर तो काही तासांतच वेगाने वायरल झाला आहे. आतापर्यंत जवळपास चार लाखांहून अधिक लोकांचे त्या व्हिडिओला व्युज मिळाले आहेत तर, एक लाखांच्या आसपास लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शविली आहे. याशिवाय अनेक भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडिओला येत आहेत.

या अगोदरही सुनीलने अनेक व्हिडिओ शेअर केले होते. त्याच्या इंस्टाग्रामवर एकदा नजर टाकल्यास त्यांच्या प्रत्येक पोस्ट केलेल्या व्हिडिओतून, तो चाहत्यांना खळखळून कसा हसवत असतो याचा अंदाज आपण बांधू शकतो. यात तर कधी तो पाणीपुरी बनवताना दिसला होता तर कधी ज्यूस बनवताना. एकदा तर चक्क त्याने एका व्हिडिओत दाल मखणी बनवली होती. आणि एकदा छोले कुलवे स्वतःच्या हाताने बनवताना त्याने व्हिडिओ शेयर केला होता. त्याच्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोतून तो सर्वांना हसवत असतो.

केवळ छोट्या छोट्या पडद्यावर नव्हे तर मोठ्या पडद्यावरही सुनील झळकला आहे. त्याची ‘तांडव’ ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान, गौहर खान, डिंपल कपाडिया हे प्रमुख भूमिकेमध्ये होते. याशिवाय तो ‘भारत’ आणि ‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटात अभिनय करताना दिसला होता.

कपिल शर्माने दारूच्या नशेत त्याला मारहाण केली असल्याच्या वादामुळे तो बऱ्याचदा चर्चेत आला होता. तो आता पुन्हा कपिल शर्माच्या मालिकेचा भाग होणार असल्याचे बोलले जात होते. पण यावर अजून त्याने अद्यापही कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.