Thursday, December 19, 2024
[aioseo_breadcrumbs]

HBD दर्शील | ‘तारे जमीन पर’ सिनेमातील छोटा ईशान आठवतोय? बदललेला लूक पाहून थक्क व्हाल

बॉलिवूडमध्ये असे काही बाल कलाकार आहेत, जे त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने खूप प्रसिद्ध झालेत. दर्शील सफारी हा त्यापैकीच एक आहे. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात दात बाहेर असणारा बाल अभिनेता दर्शील सफारी आता मोठा झाला आहे. ९ मार्च ११९९७ रोजी जन्मलेला दर्शील आता २५ वर्षांचा झालाय.

आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील अभिनेता दर्शील सफारीने याच चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात त्याने ईशानची भूमिका केली होती, जो डिस्लेक्सिया आजाराशी झुंज देत होता.

लहान वयातच राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या दर्शीलचा लूक आता खूप बदलला आहे. दर्शील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि तो सतत त्याचे फोटो शेअर करत राहतो. या फोटोंनी दाखवून दिले की आता दर्शील खूप स्मार्ट झाला आहे.

यानंतर दर्शीलने ‘बम बम बोले’, ‘जॉकॉमन’ आणि ‘मिडनाईट चिल्ड्रेन’ या चित्रपटांत काम केले. या चित्रपटातील अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटांशिवाय दर्शील सफारी छोट्या पडद्यावरही दिसला आहे. तो टीव्हीच्या डान्स रियॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ च्या सिझन 5 मध्ये दिसला होता. या व्यतिरिक्त दर्शील सफारी टीव्ही शो ‘ये है आशिकी – सुन यार ट्राय मार’ मध्ये दिसला आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिकांव्यतिरिक्त दर्शीलने बर्‍याच जाहिरातींमध्ये काम केले आहे.

अभ्यासाबरोबरच दर्शील अभिनयावरही लक्ष केंद्रित करत आहे. आजकाल तो त्याच्या नवीन चित्रपटाची तयारी करत आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.

या आगामी चित्रपटाचे पोस्टर समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप अतलुरी आहेत. या चित्रपटात दर्शील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच, ही एक प्रेमकथा आहे. दर्शीलचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात

हे देखील वाचा