Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड वडिलांच्या कुशीत बसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? बोल्ड अदांनी चाहत्यांना करते घायाळ

वडिलांच्या कुशीत बसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? बोल्ड अदांनी चाहत्यांना करते घायाळ

मागील काही दिवसात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे लहानपणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. अशातच आणखी एका अभिनेत्रीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.ओढणीतील लहान मुलगी वडिलांच्या मांडीवर आरामात पडलेली दिसते. पप्पाही तिला आपल्या मांडीवर घेऊन खूप आनंदी दिसत आहेत. ही मुलगी आता मोठी झाली असली तरी आजकाल तिचे नाव बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. मोठी झालेली ही मुलगी एकामागून एक हिट चित्रपट देत आहे आणि रोजच चर्चेत असते. ही मुलगी खूप सुंदर आणि स्टायलिश दिसते. त्याच्या कुटुंबातील एकही स्टार नाही, पण अनेक बॉलिवूड स्टार्सशी तिचे कनेक्शन आहे. सलमान खान,(salman khan) अशोक कुमार (Ashok kumar) आणि किशोर कुमारपासून सायरा बानू आणि दिलीप कुमारपर्यंत ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडलेले आहे.

कदाचित तुम्ही या मुलीला आतापर्यंत ओळखले असेल, हा अभिनेत्री कियारा अडवाणीचा (kiara Adwani)बालपणीचा फोटो आहे. फोटोमध्ये तिचे वडील जगदीप अडवाणी यांनी त्याला आपल्या मांडीवर घेतले आहे. हा फोटो कियाराने तिच्या वडिलांच्या वाढदवसानिमित्त शेअर केला आहे. फोटो शेअर करताना कियाराने तिच्या वडिलांसाठी लिहिले, “#daddysgirlforever. वाढदिवसाच्या शुभेच्छा पापा!” तिने तिच्या कॅप्शनमध्ये हार्ट इमोटिकॉन देखील शेअर केला आहे.

कियारा अडवाणीने २०१४ मध्ये फगली चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  २०१६ चा एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा तिचा ब्रेकआउट चित्रपट होता, ज्यामध्ये तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत (sushant singh rajput) काम केले होते. ती अलीकडेच ‘भूल भुलैया 2’मध्ये कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. त्याचवेळी ती वरुण धवनसोबत (varun dhavan) ‘जुग जुग जिओ’मध्ये दिसली होती. हा चित्रपट हिट ठरला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अभिनेत्री स्मिता पाटील यांचा लेक पुन्हा प्रेमात, पत्नीसोबत वेगळे झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट
स्वरा भास्करने सांगितलं तिच्या आयुष्यातील ‘तो’ किस्सा, शत्रूचाही केला खुलासा
विक्रम वेधाच्या धमाकेदार ट्रेलरला तुफान प्रतिसाद, ‘या’ बॉलिवूड कलाकारांनीही केले तोंडभरुन कौतुक

हे देखील वाचा